दक्षिण भारतातील एक ट्रॅव्हल एजन्ट बनावट कागदपत्रांद्वारे लोकांना अरब देशांमध्ये पाठवत असताना पकडला जातो. जेलमध्ये त्याची भेट सरकारी स्टॅम्प वेंडर राम रतन सोनी यांच्याशी होते. त्या जेलमध्ये मग आखला जातो भारतातील त्या काळातील सर्वात मोठा घोटाळा ! सरकारी यंत्रणा, अधिकारी, राजकारणी यांच्या संगनमताने ३२ हजार कोटींचा स्टॅम्प घोटाळा केला गेला. हा ट्रॅव्हल एजेंट होता अब्दुल…
चेंबूर नाक्याजवळील भव्य दिमाखदार ऐतिहासिक असा आर. के. स्टुडिओ पडलाय पण आजही तेथून जाताना आर. के. फिल्म बॅनरचे ‘बरसात’ पासून ‘बाॅबी’ पर्यंत आणि ‘आवारा’पासून ‘आ अब लौट चले’ पर्यंतचे अनेक चित्रपट आठवतातच आणि त्याबरोबरच आठवतो, आर. के. स्टुडिओतील बहुचर्चित श्रीगणेशोत्सव. राज कपूर कायमच ‘शो’मन म्हणून ओळखला गेला, पण त्याने आपल्या या स्टुडिओत धमाल कलरफुल होळी,…
स्वतःच आम्ही हिट झालो म्हणून टिमकी वाजवली प्रेक्षकांच्या मनात पण शाहरुखच्या स्टारडमवरती प्रश्न उपस्थित झाले होते. मग पठाण आली, शाहरुखच्या नवीन इनिंगची खबर घेऊन आणि आता ‘जवान’ या मेगा मासी फिल्ममार्फत तो काय चीज आहे आणि तो का last of the stars आहे हे दाखवून दिले आहे.
'सोनी मराठी'वर लवकरच 'अबोल प्रितीची अजब कहाणी' ही नवीकोरी मालिका सुरू होत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रोमोमुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या मालिकेत सगळ्यांचा लाडका अभिनेता 'अजिंक्य राऊत' व नवोदित अभिनेत्री 'जान्हवी तांबट' ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
सध्या सोशल मीडियावर एका नव्या आणि गोड जोडीची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आहे 'प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन'! ही जोडी नेमकी जमली कशी हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!
सध्या सिनेवर्तुळात आदिपुरुष या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटातील संवाद, दृश्य आणि सिन्सवर बऱ्याच सिनेरसिकांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जातेय. या सगळ्या चर्चांच्या, नाराजीच्या केंद्रस्थानी आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राउत!
दोन मिनिटे छत्तीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये लग्नानंतरचे प्रेम दाखवण्यात आलेले आहे. कार्तिक आर्यन ज्या रोल्ससाठी प्रसिद्ध आहे, तोच ‘चॉकलेट लवर बॉयचा’ रोल साकारताना तो दिसतोय. कार्तिक आर्यन आपल्या पात्राशी पूर्णपणे एकरूप झालेला ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. कियारा अडवाणी देखील आपल्या अभिनयाने व सौंदर्याने ट्रेलरला अजून आकर्षक करताना दिसून येते.
ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या बऱ्याच चित्रपटात सुलोचना दिदींनी काम केलं. दीदींच जन्मनाव रंगू. भालजी पेंढारकर यांनी त्यांचं नाव बदलून ते सुलोचना केलं. चित्रपटांविषयीचे अनेक बारकावे दीदी भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनात शिकल्या.
एनटीआर आणि कोरातला सिवा यांचा हा सोबत दुसरा चित्रपट (New Movie) ठरणार असून याअगोदर त्यांनी जनता गॅरेजमध्ये सोबत काम केले आहे. आरआरआर स्टार एनटीआरचा हा कारकिर्दीतील तिसावा चित्रपट ठरणार आहे.