गौरी शिंदे, शाहरुखची पत्नी हिचे पहिले पुस्तक ‘My Life in Design’ नुकतेच प्रकाशित झाले. या प्रकाशन सोहळ्याला खुद्द शाहरुख उपस्थित होता. यादरम्यानच विचारलेल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना शाहरुखने मन्नत कसा घेतला याचा किस्सा सांगितला.
आनंद रिलीज झाला. लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. राजेश खन्ना सुपरस्टार होतेच पण त्यांच्यासोबत नवख्या अमिताभ बच्चनचं देखील भरभरून कौतुक झालं. अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीतील पूर्ण लांबीचा रोल असणारा हा पहिलाच चित्रपट होता.
बॉलीवूडचे पहिलेवहिले सुपरस्टार आपल्या सिनेप्रवासात त्यांनी जो मैलाचा दगड गाठला, तिथपर्यंत पोहोचणे त्यांच्या अगोदरही कुणाला जमले नव्हते आणि त्यांच्यानंतर देखील कुणाची तिथपर्यंत मजल गेली नाही.
प्रसिद्धी काय असते हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिले. आपण कुणाबद्दल बोलतोय हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. आपल्या अदाकारीची भुरळ सिनेप्रेक्षकांना घालून, सबंध काळ गाजवणारे किंबहुना काळाच्या त्या पानांवर स्वतःच्या अस्तित्वाचा दबदबा कोरणारे, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!
भारतीय चित्रपटांनी देखील वेळोवेळी ऑस्करच्या रेड कार्पेटवर देशाची मान वेळोवेळी उंचावली आहे. भारतातून दरवर्षी एक अधिकृत चित्रपट पाठवला जातो. पण बऱ्याचदा हे चित्रपट प्राथमिक फेरीमधूनच बाहेर होतात. पण कित्येक चित्रपट, लघुपट आणि डॉकुमेंटरीजनी ऑस्करला गवसणी घालण्याचा पराक्रम देखील केला आहे. ऑस्कर सोहळ्यात भारताची मान उंचवणाऱ्या चित्रपटांविषयी थोडक्यात जाणून घेऊया.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु होती. आता मात्र त्यांनी साखरपुडा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. परिणीती चोप्रा तिच्या कामाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. तिने ज्यांच्याशी साखरपुडा केला ते राघव चड्डा कोण आहेत? त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
मे महिना जसा जसा पुढे सरकू लागतो तसतसा उन्हाळा आपला तडाका दाखवायला सुरुवात करतो. मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात. मे महिन्यातील रखरखत्या उन्हात मराठी चित्रपटांचा खजिना तुम्हाला थंडावा देऊ शकतो. मे महिन्यात कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, बघुया.
एवढ्या मेहनतीने निर्माण केलेल्या चित्रपटाला प्रदर्शनानंतर मात्र चित्रपटगृहात प्रेक्षक असूनदेखील स्क्रीन्स दिल्या जात नाहीत, त्यांचे शोज् लावले जात नाहीत. अशा परीस्थितीत एखाद्या कलाकाराने काय करावे? अशा परिस्थितीत कलाकारांजवळ आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
सगळ्या पिक्चरमध्ये एक माणूस मात्र कुणालाच आवडला नाही. तो म्हणजे कॉलेजचा डीन जे अस्थाना. जेव्हा लोकांना त्या पात्राचा राग यायला लागला तिथेच ते पात्र साकारणारा नट जिंकला होता आणि ते कोण होते हे काही वेगळं सांगायची गरज नाही. अर्थातच बोमन इराणी. त्याचं काम जेवढ खतरनाक होतं तेवढाच खतरनाक त्यांच्या कास्टिंगचा किस्सा देखील आहे.
देशातील सर्वात थरारक मर्डर मिस्ट्रीपैकी एक असलेल्या शीना बोरा खून प्रकरणावर एक वेबसिरीजही बनवली जाणार आहे. सध्या वेबसिरीजमध्ये हत्येचे रहस्य, खळबळजनक घटना, मोठे अपघात आणि ऐतिहासिक घटना आदींचा ट्रेंड आहे. देशातील अनेक गाजलेल्या गुन्हेगारी घटनांवर भव्य वेबसिरीज आल्या आहेत.