Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss OTT 2: होस्टिंग करताना सिगरेट ओढताना दिसला सलमान खान; सोशल मिडीयावर होतोय ट्रोल 

बिग बॉस हा शो नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. सध्या सुरु असलेल्या बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये दररोज काही ना काही वाद पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा हा शो चर्चेत आला आहे पण यावेळी वादाचा विषय कोणत्याही स्पर्धकाची अॅक्शन नसून खुद्द सलमान खानची अॅक्टिव्हिटी आहे. सलमान खानचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ‘वीकेंड का वार’ एपिसोडच्या या फोटोमध्ये सलमान खान हातात सिगारेट दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी सलमानच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.8 जुलै रोजी बिग बॉस ओटीटी सीझन 2 या शोचा तिसरा वीकेंड वॉर एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला. मात्र यावेळी सोशल मीडियावर काही युजर्स संतापलेले दिसत असून याचे कारण सलमान खानचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात तो सिगारेटसोबत दिसत आहे. (Salman Khan Smoking)

Salman Khan Smoking
Salman Khan Smoking

बिग बॉस ओटीटी 2 च्या सेटवरून सलमान खानने हातात सिगारेट घेतलेला फोटो व्हायरल झाला आहे. सलमानचा फोटो आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याच्या हातात सिगारेट दिसत आहे. हा फोटो बिग बॉस ओटीटी 2 च्या सेटवरील आहे. या फोटोमध्ये सलमान खान बोटांमध्ये पांढरी सिगारेट पकडलेली दिसत आहे. मात्र, या फोटोच्या सत्यतेबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही. शोच्या शूटिंगदरम्यान तो सिगारेट ओढत असल्याचं सोशल मीडियावर युजर्सचं म्हणणं आहे. सलमान चा हा फोटो व्हायरल झाल्यापासून नेटकरी त्यावर रागत कमेंट करताना सुद्धा पहायला मिळत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “आता आम्हाला कळले आहे की सलमान किती मोठा पाखंडी आहे. जर तुम्ही इतरांच्या संस्कृतीसाठी आणि मूल्यांसाठी प्रार्थना करत असाल तर स्वत: नीट वागा. तर आणखी एकाने लिहिले की, “हे ओटीटीवर नाही तर नॅशनल टीव्हीवर आहे… त्यामुळे काही कायदेशीर अडचण येईल असे मला वाटत नाही. अजुन एका युजरने लिहिले की, सलमानने एफ हा शब्द वापरला पण तो म्यूट नव्हता, कदाचित हा शो ओटीटीवर आहे याचा फायदा निर्मातेही घेत आहेत.”

Salman Khan Smoking
Salman Khan Smoking

काही दिवसांपूर्वी सलमान खानने आकांक्षा पुरी आणि जेद हदीद यांचे चुंबन सांगितले होते. आता तो स्वत: सिगारेट ओढताना दिसला. जनतेला हे समजले नाही. व्हायरल झालेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. (Salman Khan Smoking)

=============================

हे देखील वाचा: बॉलीवुड अभिनेत्रींच्या कपड्यांचे भाव ऐकून येईल चक्कर;ड्रेसच्या किमतीत खरेदी करता येईल घर !

=============================

सायरस ब्रोचा यांच्याशी झालेल्या संभाषणात सलमान खानने F शब्दाचा वापर केला  होता. घरातून  बाहेर पडण्याबद्दल बोलणाऱ्या सायरसला समजावताना सलमानच्या तोंडून रागाच्या भरात शब्द बाहेर पडले. सायरस वारंवार घरी जाण्याचा आग्रह धरत होता. यावर सलमानने त्याला समजावले की त्याला जायचं असेल तर दंड भरून बाहेर पड.