Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss 19: ‘ तुझ्याशिवाय दिवाळी अपूर्ण वाटतेय रे..’; सर्वांना हसवणारा प्रणित मोरे ढसाढसा रडला…

‘बिग बॉस 19’च्या भागात नेहमीसारखं भांडणं, कटकारस्थानं आणि वाद न पाहता प्रेक्षकांना या वेळी घरातील भावनिक क्षणांचा अनुभव घेतला आहे. प्रत्येक वेळी ‘वीकेंड का वॉर’मध्ये सलमान खान स्पर्धकांची क्लास घेतो, पण या आठवड्यात मात्र वातावरण अगदी विरळं आणि ओलावलेलं दिसणार आहे. घरात एक अनोखा ट्विस्ट आला  एक विशाल कबुतर ‘बिग बॉस’च्या घरात येऊन सर्व स्पर्धकांसाठी त्यांच्या कुटुंबियांची पत्रं घेऊन येतं. या क्षणानेच वातावरणात भावनांचा पूर येतो. ‘चिठ्ठी आयी है…’ या प्रसिद्ध गाण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आपापली चिठ्ठी उचलतो आणि वाचताना डोळ्यांतून अश्रू ओघळतात.(Bigg Boss 19)

Bigg Boss 19

या सर्वांमध्ये मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे सर्वात जास्त भावनिक झाल्याचं दिसून येतं. प्रणितला आलेल्या पत्रात लिहिलेलं असतं  “प्रिय प्रणित, एकही दिवस असा नाही गेला की आम्हाला तुझी आठवण आली नाही. यंदाची दिवाळी थोडी अपूर्ण वाटते आहे.” हे शब्द वाचताना प्रणित अक्षरश: ओक्साबोक्शी रडतो आणि घरातील सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी येतं. तसेच मृदूल तिवारी आणि कुनिका सदानंद यांनाही त्यांच्या कुटुंबियांची पत्रं मिळतात. मृदूलला भावंडांचं पत्र मिळतं तर कुनिकाला तिच्या मुलाचं पत्र वाचताना दिसतं. त्यांच्या शब्दांमध्ये प्रेम, आठवण आणि अभिमानाचा ओलावा जाणवतो.

Bigg Boss 19

या भावनिक प्रसंगानंतर संपूर्ण ‘बिग बॉस’चं घर काही क्षणांसाठी शांत होतं. दिवाळीसारख्या सणाच्या काळात कुटुंबापासून दूर असण्याची वेदना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. सोशल मीडियावर या एपिसोड ने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना आधार आणि प्रेमाचा वर्षाव केला आहे..(Bigg Boss 19)

================================

हे देखील वाचा: 50 वर्ष जुन्या ‘दिसला गं बाई दिसला’ लावणीवर थिरकली Gautami Patil; ललित प्रभाकरची ही मिळाली साथ…

================================

१६ ऑक्टोबरच्या भागात हे सर्व हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाले असून, प्रेक्षकांसाठी हा एपिसोड नक्कीच एक भावनिक अनुभव देणारा ठरला.या सीजनमध्ये चाललेल्या भांडणांमध्ये आणि वादांमध्येही या चिठ्ठ्यांनी घरात एका क्षणासाठी तरी ‘माणुसकी’ आणि ‘जिव्हाळा’ परत आणला आहे आणि कदाचित याच क्षणांमुळे ‘बिग बॉस 19’ चाहत्यांच्या मनात आणखी खोलवर घर करेल.