Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: ‘भाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा, बंद करा’ रितेश ने रुचिताला दाखवला बाहेरचा रस्ता

बिग बॅास मराठी ६ (Bigg Boss Marathi) च्या सहाव्या पर्वात सध्या वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. या रिअॅलिटी शोमध्ये दर आठवड्याला होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरतो. आठवडाभरातील टास्क, वाद, मैत्री आणि मतभेद यांचा सविस्तर आढावा घेतला जातो. चांगल्या कामगिरीचं कौतुक केलं जातं, तर चुकीच्या वर्तनावर थेट आणि कठोर शब्दांत सुनावलं जातं.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Update

यावेळी मात्र सूत्रसंचालक रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा संताप अनावर झालेला दिसतो. त्यांचा रोष स्पर्धक रुचिता जाधव (Ruchita Jadhav) हिच्याकडे वळलेला आहे. एका भागात रुचिताने दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांच्या समोर “आ थू” अशी प्रतिक्रिया दिल्याचं दाखवण्यात आलं. या कृतीमुळे घराबाहेरही चर्चा रंगली असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Bigg Boss Marathi 6 Update

‘भाऊचा धक्का’मध्ये या मुद्द्यावर थेट प्रश्न उपस्थित करत रितेश म्हणाले, “रुचिता तुम्ही दिपाली यांच्यासमोर आ थू असं केलं.” रुचिता मध्येच बोलण्याचा प्रयत्न करताच त्यांनी तिला थांबवत स्पष्ट केलं, “मी बोलतो आहे ना.” पुढे त्यांनी कठोर शब्दांत सुनावत म्हटलं, “तुम्ही जे केलं आहे ते महाराष्ट्रातल्या कोणत्याच आईला आवडलं नाही आहे.” रुचिताच्या हावभावांमुळे वातावरण आणखी चिघळलं. संतप्त होत रितेश म्हणाले, “हे असे एक्स्प्रेशन द्यायचे असतील तर आत जा, भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. उठा आणि निघा.” शेवटी त्यांचा “बंद करा” असा आदेशही ऐकू आला. (Bigg Boss Marathi 6)

===================================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’ खास क्षण झाला कॅमेरात कैद !

===================================

या घटनेनंतर घरातील समीकरणं बदलणार का ? रुचितावर काही कठोर कारवाई होणार का,? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आगामी भागात या वादाचा नेमका काय शेवट होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार ही आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!