Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: सागरच्या सल्ल्यामुळे घरात मतभेदांचा भडका; सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष!

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi 6  सध्या चांगलाच रंगात आला आहे. घरात सुरू असलेल्या सततच्या वादांमुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. या मतभेदांचा परिणाम केवळ वैयक्तिक नात्यांवरच नाही, तर प्रत्येक सदस्याच्या गेमवरही स्पष्टपणे दिसून येतो आहे. अलीकडेच घरात झालेल्या एका चर्चेमुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादात सागर कारंडेने अनुश्रीला दिलेला सल्ला आणि राकेशची घेतलेली बाजू यामुळे घरातील सदस्यांमध्ये वैचारिक संघर्ष उफाळून आला. चर्चेदरम्यान सागर म्हणाला, “जर तू स्पष्टपणे ‘प्लीज मला हात लावू नकोस’ असं सांगितलंस, तर समोरचा ते नक्की स्वीकारेल. मुद्दा तिथेच संपतो. पण आता मला असं वाटायला लागलंय की तुमच्याशी बोलताना देखील भीती वाटतेय.” यावर अनुश्रीने विचारले, “आता मी जाऊन बोलू का?” त्यावर सोनालीने थोडक्यात उत्तर दिले, “मला माहिती नाही, बाबा यांनाच विचार.” या संभाषणातून घरातील संवादाची पातळी, शब्दांची निवड आणि ऐकून घेण्याची तयारी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित झाले. (Bigg Boss Marathi 6) 

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Fight

यानंतर अनुश्रीने तिची भूमिका स्पष्ट करत सांगितले,“मी आधी काय बोलले ते ऐक. आम्ही तुम्हाला बहिणीसारखं मानतोय असं सांगितलं. समजावून सांगितल्यानंतरही तुम्ही म्हणताय हात लावू नका? आम्ही इथे तसं काही करायला आलो आहोत का?” दरम्यान, रुचितानेही आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की तिचा हेतू कोणाच्याही चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा नव्हता. ती म्हणाली, “ते सगळं परमिशनसंदर्भात होतं. मी कुणावरही आरोप केलेले नाहीत. समोर कोणतीही मुलगी असती तरी मी तेच बोलले असते.” सागरने पुढे सर्वांना समजावून सांगताना म्हटले की प्रत्येकजण इथे गेम खेळायला आला आहे आणि छोट्या गोष्टींवरून विषय वाढवण्याऐवजी योग्य वेळी संवाद साधणे गरजेचे आहे.“तिला वाईट वाटलं, तुला वाईट वाटलं, तेव्हाच बोलायला हवं होतं,” असा सल्लाही त्याने दिला.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Fight

रुचिता मात्र आपल्या मतावर ठाम राहिली. ती म्हणाली, “त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे बिग बॉस त्यांना बोलणारच. मी नवीन आहे, पण माझा हेतू चुकीचा नव्हता. भाऊ काहीही बोलले तरी किंवा संपूर्ण घर माझ्या विरोधात गेलं तरी मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.” या सगळ्या चर्चांमुळे हे स्पष्ट झाले आहे की घरातील मतभेद आता केवळ वैयक्तिक पातळीवर मर्यादित राहिले नसून, गेमच्या रणनीतीचा देखील भाग बनले आहेत. लहानसा वाद पुढे जाऊन मोठे समीकरण बदलू शकतो, हेच या प्रसंगातून दिसून येते. (Bigg Boss Marathi 6)

==============================

हे देखील वाचा: Prasad Oak च्या मोठ्या लेकाचा पार पडला साखरपुडा, होणारी सून आहे तरी कोण?

==============================

आता या वादानंतर घरातील सदस्य पुढे कशी वाटचाल करणार, नात्यांमध्ये सुधारणा होणार की आणखी दुरावा वाढणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे.घरातील प्रत्येक नवा ट्विस्ट आणि अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सिझन ६, दररोज रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर!

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!