Skip to content Skip to sidebar Skip to footer

गोलीगत सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीचा ‘गेम कळला नाही, पण त्याला माणसं कळली…’

बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि गोलीगत सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला. गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, असे म्हटले जाऊ लागले. पण त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.(Goligat Suraj Chavan)

Goligat Suraj Chavan
Goligat Suraj Chavan

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो,”बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता”. त्यावर अंकिता म्हणते,”सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली”.

Goligat Suraj Chavan

टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाणचं नेटकऱ्यांकडून चांगलच कौतुक होत आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घरदेखील गाजवत आहे. दुसरीकडे अरबाजमुळे निक्की प्रचंड दुखावलेली दिसत आहे. वैभव आणि जान्हवी निक्कीला समजावत दिसत आहे. दरम्यान “तुला वाचवण्यासाठीच अरबाज प्रयत्न करत होता”, असं वैभव निक्कीला म्हणत आहे. त्यावर निक्की म्हणते,”गेलं खड्ड्यात…एवढं प्रेम दाखवून देखील मी नॉमिनेट झाली आहे”.(Goligat Suraj Chavan)

===============================

हे देखील वाचा: Big Boss Marathiच्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं; कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

===============================

‘बिग बॉस मराठी’च्या घरात पॅडीने अभिजीतची नक्कल केली आहे. अभिजीतची नक्कल करत पॅडी म्हणतोय,”हे बघा मित्रांनो.. आपण आज इथे आलो आहोत तर आपल्याला टिकून राहणं खूप गरजेचं आहे. गाणं ऐकूण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. शक्ती आहे तर आपल्याकडे युक्ती आहे”. दरम्यान घरातील इतर सदस्य धमाल करताना दिसत आहेत.