Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss OTT 3: पुढील महिन्यापासून सुरू होणार ‘बिग बॉस ओटीटी सीझन 3’, जाणून घ्या संपूर्ण माहिती

बिग बॉस हा टीव्ही विश्वातील अत्यंत लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे, त्याचे यश पाहता निर्मात्यांनी बिग बॉस ओटीटी व्हर्जन आणले आणि त्याला जबरदस्त यशही मिळाले. पहिल्या ओटीटी सीझनमध्ये दिव्या अग्रवाल विजेती ठरली आणि त्यानंतर प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव विजेता ठरला आणि आता असे म्हटले जात आहे की निर्माते त्याचा तिसरा भाग घेऊन येत आहेत आणि याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.यासोबतच सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी संबंधित माहितीही समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहीती.(Bigg Boss OTT 3)

Bigg Boss OTT 3
Bigg Boss OTT 3

टीव्हीवरील ‘बिग बॉस 17’ संपल्यानंतर आणि ‘बिग बॉस 18‘च्या आगमनापूर्वी चाहते ओटीटीवर ‘बिग बॉस ओटीटी 3’ची वाट पाहत आहेत, ज्याबद्दल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील महिन्यात मे महिन्यात या शोचा प्रीमियर होणार आहे. प्रीमियरची तारीख १५ मे सांगितली जात आहे. ‘बिग बॉस 17’मध्ये झळकलेली अंकिता लोखंडेचा पती विकी जैन ‘बिग बॉस ओटीटी 3′चा भाग असू शकतो.

Bigg Boss OTT 3
Bigg Boss OTT 3

बिग बॉस ओटीटी सीझन 3 साठी प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. रिपोर्टनुसार, बिग बॉस ओटीटी सीझन 3 चा प्रीमियम 15 मे 2024 रोजी असेल. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बिग बॉसचा तिसरा सीझन मे 2024 पासून सुरू होईल आणि जिओसिनेमावर स्ट्रीम होईल. (Bigg Boss OTT 3)

==================================

हे देखील वाचा: Diljit Dosanjh Wife: दिलजीत दोसांझची पत्नी आणि मुलगा राहतात अमेरिकेत, जवळच्या मित्राने केला धक्कादायक खुलासा

==================================

बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये मागील सीझनप्रमाणे यावेळीही अनेक वादग्रस्त सेलेब्स पाहायला मिळणार आहेत. रिपोर्टनुसार, आतापर्यंत टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर, शहजाद धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप स्पर्धकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या सीझनमध्ये सना सईद, ईशा शरवानी, अभिषेक मलिक आणि पत्नी सुहानी चौधरी यांचा समावेश असू शकतो.