Skip to content Skip to sidebar Skip to footer

गोष्ट चमकत्या ताऱ्यांची

Shwetambari Ghute
‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज
छोट्याशा भूमिकेतूनही रसिकांच्या हृदयात पोहोचायचं, हे सोपं काम नाही. श्वेतांबरी घुटे या गुणी अभिनेत्रीनं ते करून दाखविलं. ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील ‘मारिया’ या भूमिकेचं तिनं सोनं केलं. सध्या दाक्षिणात्य कलाक्षेत्रात व्यस्त असलेल्या श्वेतांबरीचा हा प्रवास रोचक तेवढाच इतरांसाठी प्रेरणादायी असाच आहे.
रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस
राजसी चिटणीस… कलेची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली मनस्वी कलावंत. कलाकारांची नवी पिढी सिनेमा, मालिका या क्षेत्रांविषयी अधिक महत्त्वाकांक्षी असते. मात्र, राजसीनं पदार्पणातच रंगभूमी स्वीकारली, हेच तिच्यातील वेगळेपण. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून तिचं पदार्पण झालंय. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड-मेढेकर यांच्यासोबत ती काम करतेय. ‘नाटकांतच आधी पाया मजबूत करायचाय. नंतरचं नंतर पाहू’,…
नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’
इंडियन नेव्हीमध्ये संतोष ओझा यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, कलासक्त संतोष यांनी कलाक्षेत्राची वाट धरली. देशाची सेवा आपण कलेच्या माध्यमातूनही करू शकतो. आपण समाजाला काही देणं लागतो, ते कलेच्या माध्यमातून का होईना, ही त्यांची धारणा आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘प्यारे पापा’ हा लघुपट सध्याच डिझ्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्त…
देवेंद्र दोडकेंनी गाजविला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’
देवेंद्र दोडके… रंगभूमी, मालिका अन् चित्रपटसृष्टी या तिन्ही माध्यमांतलं खणखणीत नाणं. नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’मधील भूमिकेमुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील भूमिकेसाठी त्यांना ‘झी गौरव’ प्राप्त झालाय. व्यावसायिक रंगभूमीवर गेल्या २५ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. कित्येक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या सशक्त अभिनयानं छाप पाडलेली आहे. त्यांचा हा रंजक प्रवास…
हाडाचा शिक्षक अन् जातिवंत ‘स्टार’ कलाकार : सचिन गिरी
सचिन गिरी… आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वानं अन् अभिनयकौशल्यानं रंगमंच, पडदा व्यापण्याची क्षमता असलेला मनस्वी कलावंत. सुरुवातीला तो डॉक्टर होणार होता. मात्र, शिक्षणक्षेत्राकडे त्याची पावलं वळली. तो हाडाचा शिक्षक आहे अन् जातिवंत कलाकारही. २६ नाटकं-एकांकिका, १४ हिंदी-मराठी चित्रपट, १३ महानाट्ये, ‘संत गजानन शेगावीचा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’सारख्या काही मालिका, बऱ्याच जाहिराती अशी त्याची प्रवाही वाटचाल आहे.…
मुंबईत बोलवून फसवणूक; तरी ‘चमकला’ शरत सोनू
शरत सोनू छोट्या व मोठ्या पडद्यावरचा सुपरिचित चेहरा. ‘आयडिया’, अजय देवगणसोबतची ‘महिंद्रा’ अशा सत्तरवर जाहिराती, ‘झोंबिवली’, ‘सुपर ३०’, ‘कागज’ असे कित्येक चित्रपट त्याच्या नावावर आहेत. एका ऑडिशनच्या नावाने फसवला गेलेला शरत मुंबईत छोट्या वयातच दाखल झाला. खूप हाल झाले. मात्र, काहीतरी बनल्याशिवाय गावी परत जायचं नाही, असा निश्चय त्यानं केला. खरंतर त्या फसवणुकीचा त्याला…
छोट्याशा खेड्यातून ‘आंतरराष्ट्रीय’ झेप घेणारी रावी किशोर
रावी किशोर! खेडेगावात राहून कुछ कर दिखाने के सपने पाहणारी अन् ते तेवढ्याच धडाडीनं साकार करणारी मुलगी. मराठी आणि कोंकणीसह मल्याळम, तेलुगू, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या भाषांतील चित्रपटांतून ती कामं करते आहे. एवढंच नाही तर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात ‘इफ्फी’मध्ये तिची प्रमुख भूमिका असलेले वेगवेगळ्या भाषांतील सिनेमे निवडले गेले. तिला पुरस्कारही मिळाले.…
‘सिंघम रिटर्न्स’ फेम संध्याचा अंदाज सदैव ‘स्पेशल’च
संध्या कुटे… ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये लेडी कॉपची तिची एंट्री जबरदस्त आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह ‘स्वच्छ भारत अभियान’ तसेच ‘केबीसी’ यांसह बऱ्याच जाहिराती, काही मालिका, ‘सिम्बा’, ‘कैदी बँड’, ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ यासारखे चित्रपट, कित्येक शॉर्टफिल्म्स तिच्या नावावर आहेत. माध्यम विश्वातून सुरू झालेला तिचा प्रवास आता मनोरंजनक्षेत्र व्यापू पाहात आहे. अपघातानंच या क्षेत्रात ती आली असली तरी…
कधीकाळी स्टेज डेअरिंग नसलेली शुक्लिमा आज करतेय ‘शाइन’
डॉ. शुक्लिमा पोटे! स्वप्नांना जिद्दीची जोड दिली तर काय होऊ शकतं, याचं आदर्शवत उदाहरण. कलावंत बनायचं तर बालपणापासून तयारी हवीच, असं नाही. मनात काहीतरी करून दाखविण्याची ठिणगी पेटली तर असाध्य गोष्टीही साध्य होतात, हे तिनं सिद्ध करून दाखविलं. नाट्यक्षेत्रात आज तिच्या कामाची दखल घेतली जातेय. तापसी पन्नूसोबत ‘दोबारा’मध्ये झळकण्याची संधी तिला मिळाली. संवेदनशील डॉक्टर असण्यासोबत…
लढवय्या कलावंत शैलेश दुपारेचा संघर्ष सातासमुद्रा‘पल्याड’
शैलेश दुपारे! अपार संघर्षानंतर आपली स्वप्न पूर्ण करणारा, एवढंच नव्हे तर जागतिक पातळीवर स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडणारा लढाऊ कलावंत. अतिशय वेगळ्या धाटणीचा ‘पल्याड’ हा त्याचा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे ‘फोर्ब्स’ या आंतरराष्ट्रीय मासिकाने त्याच्या या चित्रपटाची दखल घेतली आहे. तमाम मराठी कलावंतांसाठी ही अभिमानाची बाब आहे. एफटीआयआयमधून शिक्षण पूर्ण…