Skip to content Skip to sidebar Skip to footer

Chandu Champion Ott Release: आता घर बसल्या पाहा ‘चंदू चॅम्पियन’; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार प्रदर्शित

कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार व्यवसाय केला आणि यासोबतच कार्तिक आर्यनच्या हिट लिस्टमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली. ‘चंदू चॅम्पियन’च्या कथेबरोबरच प्रेक्षक अभिनेत्याच्या अभिनयाचं ही कौतुक करत होते. पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाचे चाहते ओटीटीवर प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात भाग्यश्री पटवर्धन, राजपाल यादव, भुवन अरोरा, विजय राज आणि अनिरुद्ध दवे यांसारखे कलाकार होते. १२० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशभरातील बॉक्स ऑफिसवर ७३.५ कोटी रुपयांची कमाई केली. साहजिकच हा चित्रपट चित्रपटगृहात कमाल करू शकला नाही, पण आता तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येत आहे आणि त्यामुळे आता तुम्ही हा सिनेमा घरबसल्या आरामात पाहतायेणार आहे. जाणून घेऊयात या बद्दल अधिक माहिती.(Chandu Champion Ott Release)

Chandu Champion Ott Release
Chandu Champion Ott Release

अभिनेता कार्तिक आर्यनने  ‘चंदू चॅम्पियन’ मध्ये मुरलीकांत पेटकरची भूमिका साकरली आहे. मुरलीकांत हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे. कोट्यवधी लोकांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार आहे. कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आधीच रेंट ने उपलब्ध आहे. त्याचबरोबर पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये त्याच्या फ्री स्ट्रीमिंगशी संबंधित तपशीलही समोर आला आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट आता 9 ऑगस्ट 2024 रोजी ओटीटी स्ट्रीमिंगसाठी सज्ज झाला आहे.आणि  ‘चंदू चॅम्पियन’ केवळ अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

Chandu Champion Ott Release
Chandu Champion Ott Release

साजिद नाडियाडवाला यांनी या बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामाची निर्मिती केली आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ३५.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात २०.२५ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात ४.८५ कोटींचा गल्ला जमवला. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण ६१.८ कोटींची कमाई केली.(Chandu Champion Ott Release)

================================

हे देखील वाचा: The Ring of Power 2 च्या दुसऱ्या सीझनचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार  प्रीमियर!

================================

अभिनेता कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन आता हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील दिसणार आहे.