Skip to content Skip to sidebar Skip to footer

आईची साडी आणि नथ घालून मराठमोळा साज करत छाया कदम यांची कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी

अभिनेत्री छाया कदम सध्या फ्रेंच रिव्हेरामध्ये आपले सुंदर क्षण एन्जॉय करत आहे. ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या मराठी चित्रपटातून त्या कान्समध्ये पदार्पण करत आहेत. छाया यांनी यानिमित्ताने फिल्म फेस्टिव्हलचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांनी आपल्या दिवंगत आईची साडी परिधान केली आहे. छाया या साडीत खूपच सुंदर दिसत आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हल सध्या चर्चेचा विषय आहे. महोत्सवासाठी इतर सेलिब्रिटींनी महागडे आणि स्टायलिश कपडे परिधान केले होते, तर छाया कदम यांनी मात्र कान्ससाठी सर्वात वेगळा लूक निवडला आणि त्यांनी उत्सवासाठी आपल्या आईची साडी परिधान केली होती.(Chhaya Kadam in Cannes Film Festival)

Chhaya Kadam in Cannes Film Festival
Chhaya Kadam in Cannes Film Festival

छाया यांनी आपल्या दिवंगत आईची सोनेरी रंगाची साडी आणि जांभळ्या रंगाचा भरतकाम केलेला ब्लाउज परिधान केला होता. त्यांनी डँगलर इयररिंग्स आणि साडीसह नाकात नथ ही घातली होती, जी त्यांच्या आईचीच होती. या साडीमध्ये छाया कदम यांचा लूक खूपच सुंदर दिसत होता. छाया यांनी फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘आई, तुला विमानात नेण्याचं माझं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण आज कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मी तुझी साडी आणि नथ विमानात आणलं याचा मला आनंद आहे. हे सर्व पाहण्यासाठी आच तु मला हवी होतीस, आई मी तुझ्यावर प्रेम करते आणि मला तुझी खूप आठवण येते.”

Chhaya Kadam in Cannes Film Festival
Chhaya Kadam in Cannes Film Festival

छाया कदम यांनी नुकतीच किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटात मंजू माईची भूमिका साकारली होती. त्यानंतर ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या मराठी चित्रपटातून त्या कान्समध्ये पदार्पण करत आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांचा हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. छाया कदम यांच्या सोबत तिची ऑल वी इमेजिन एज लाइट सहकलाकार कानी कुश्रुती, हृदयू हारून आणि दिव्या प्रभा देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाणार आहेत.(Chhaya Kadam in Cannes Film Festival)

===============================

हे देखील वाचा: ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेत गौरव घाटणेकर दिसणार प्रमुख भूमिकेत

==============================

अभिनेत्री छाया कदम या मराठी सिनेसृष्टीतील खुप लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आता हिंदी सिनेसृष्टीतील त्यांच काम पाहुन तिथेही त्यांचे चाहते होतील यात काही शंका नाही.