Skip to content Skip to sidebar Skip to footer

Kedar Shinde दिग्दर्शक केदार शिंदे यांची फिल्मी प्रेमकहाणी

आज मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) त्यांचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ जानेवारी १९७१ रोजी मुंबईमध्ये केदार यांचा जन्म झाला. केदार यांचे बालपण कलेच्या वातावरणतच गेले. कारण केदार शिंदे हे प्रसिद्ध लोकशाहीर साबळे (Lokshahir Sable) यांचे नातू आहेत. त्यामुळे घरात कायम कलेचा वास होता. साहजिकच केदार यांच्या मनात देखील कलेबद्दल स्थान निर्माण झाले. (Kedar Shinde)

केदार शिंदे हे शाहीर साबळ्यांचा नातू आहेत. त्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा‘ (Maharashtrachi Lokdhara) या कार्यक्रमापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर भरत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे यांनी ‘बॉम्बे-ए-मेरी-जान’ या नाटकाने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. (Kedar Shinde Birthday)

Kedar Shinde

केदार शिंदे यांनी दिग्दर्शनात त्यांचे करियर केले. मात्र यासोबतच ते उत्तम लेखक देखील आहेत. केदार शिंदे यांनी त्यांच्या करियरमध्ये श्रीयुत गंगाधर टिपरे, घडलंय बिघडलंय, हसा चकट फु, सुखी माणसाचा सादर आदी अनेक सुपरहिट मालिकांचे, सही रे सही, लोच्या झाला रे, श्रीमंत दामोदर पंत, गेला उडत आदी नाटकांचे आणि अगंबाई अरेच्चा, यंदा कर्तव्य आहे, खो खो, महाराष्ट्र शरीर, बाईपण भारी देवा आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. (Ankahi Baatein)

केदार शिंदे यांच्या कामाबद्दल तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचे यशस्वी व्यावसायिक आयुष्य नेहमीच इतर नवोदित लोकांसाठी प्रेरणा देणारे आहे. मात्र आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या वैयत्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. केदार शिंदे यांनी बेला शिंदे यांच्याशी लग्न केले असून, त्यांना सना शिंदे नावाची एक मुलगी आहे. (Kedar shinde Lovestory)

केदार आणि बेला यांचे लव्ह मॅरेज आहे. त्यांची प्रेम कहाणी कमालीची रंजक आणि चित्रपटाला साजेशी आहे. केदार आणि बेला यांची पहिल्यांदा भेट झाली ती ‘लोकधारा’च्या निमित्ताने. बेला यांची मोठी बहीण ‘लोकधारा’च्या ग्रुपमध्ये डान्स करायची. एक दिवस बेला त्यांच्या बहिणीचा डान्स पाहायला गेल्या. बेला यांनाही नृत्याची आवड असल्याने त्यासुद्धा या ग्रुपमध्ये सामील झाल्या. (Entertainment mix masala)

Kedar Shinde

त्यावेळी लोकधारामध्ये केदार डान्स शिकवायला होते. याचकाळात केदार आणि बेला यांची ओळख झाली आणि त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली होती. याच दरम्यानच त्यांच्यात प्रेम फुलायला लागले होते. पुढे केदार यांनीच त्यांच्या भावना ओळखल्या आणि बेला यांना पहिल्यांदा प्रपोज केले होते. (Latest Marathi News)

मात्र त्यावेळी बेला यांनी केदार यांच्या प्रपोजल नकार देत त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. मात्र केदार यांनी हार मानली नाही. सतत दोन वर्षे ते बेला यांच्या मागे होते. अखेर बेला यांनी केदार यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. पुढे ९ मे १९९६ साली केदार यांनी बेला यांच्याशी लगीनगाठ बांधली. त्यानंतर दोन वर्षांनी १९९८ साली त्यांना सना नावाची एक मुलगी झाली. (Director Kedar SHinde)

===============

हे देखील वाचा : Sidharth Malhotra मॉडेलिंग, सहाय्यक दिग्दर्शक ते बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता जाणून घ्या सिद्धार्थ मल्होत्राचा अभिनय प्रवास

Vijay Sethupathi टेलीफोन बूथ ऑपरेटर ते पॅन इंडिया स्टार जाणून घ्या विजय सेतुपतीचा अभिनय प्रवास

===============

बेला शिंदे यांनी सोशॉलॉजी या विषयात पदवीप्राप्त केली असून, त्या भरतनाट्यम देखील कुशल आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेपासून बेला यांनी केदार यांच्यासोबत प्रॉडक्शनचे काम सुरु झाले. आता बेला शिंदे या निर्माती म्हणून नावारुपास आल्या आहेत.