Skip to content Skip to sidebar Skip to footer

वाढदिवसाच्या निमित्ताने Gashmeer Mahajani ने केली मोठी घोषणा; आता दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत !

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि बहुमुखी कलाकार गश्मीर महाजनी आता अभिनयाच्या नाटकातून बाहेर पडून दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून नवीन प्रवास सुरू करत आहे. मराठी सिनेमांमध्ये तसेच हिंदी मालिकांमध्येही आपल्या कामगिरीने प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडणाऱ्या गश्मीरने आता आपली सर्जनशीलता कॅमेऱ्याच्या मागून साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या नवीन भूमिकेचा शुभारंभ त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियावर मोठ्या उत्साहाने जाहीर करण्यात आला असून, या घोषणामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा उत्सव रंगला आहे. (Actor Gashmeer Mahajani)

Gashmeer Mahajani

त्याची बायको गौरी महाजनी आणि माधवी महाजनी यांच्या सहकार्याने गश्मीर महाजनीने  त्याच्या पहिल्या चित्रपटाचा तो निर्माता आणि लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी घेणार असल्याचे जाहिर केले आहे. अनेक वर्षांचा अभिनय अनुभव असलेल्या गश्मीरसाठी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणे ही एक मोठी आणि महत्वाकांक्षी पायरी आहे. त्याला यापूर्वी अनेक वेळा अभिनयाद्वारे कथा सांगण्याची संधी मिळाली आहे, मात्र आता तो स्वतःच्या दृष्टीकोनातून कथा साकारण्याचा निर्णय घेत आहे.

या चित्रपटाचे छायांकन सुप्रसिद्ध डीओपी सत्यजीत शोभा श्रीराम यांच्या कुशल हातांतून होणार असून, त्यांच्या दृष्टीकोनातून या चित्रपटाला एक वेगळाच कलात्मक अनुभव मिळणार आहे. गश्मीरच्या या नव्या प्रवासाला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते आणि चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. या नव्या प्रयोगासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून, त्यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे.(Actor Ghashmeer Mahajani)

====================================

हे देखील वाचा: Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय आणि उत्कंठेची घडणार मराठी सफर!  

====================================

यावेळी गश्मीर महाजनीने आपल्या भावनिक प्रवासाबाबत सांगितले की, ”अभिनय करताना त्याला अनेक अनुभव मिळाले पण मनात अनेक कथा अशा होत्या ज्या त्याला सांगायच्या होत्या. दिग्दर्शनामुळे त्याला त्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. या चित्रपटाला तो आपली अनेक वर्षे मांडत आलेली कल्पना मानतो. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी या प्रवासाला सुरुवात होणे त्याच्यासाठी एक भावनिक क्षण आहे. त्याला या नव्या जबाबदारीची जाणीव असूनही, प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम त्याला पुढे जाण्यासाठी बळ देत आहे.” असे तो म्हणतो. अभिनयापासून दिग्दर्शनाकडे जाणाऱ्या गश्मीर महाजनाच्या या प्रयोगाने मराठी सिनेसृष्टीत नवीन रंग भरतील असा विश्वास आहे. चाहत्यांना या चित्रपटाच्या विषयाबाबत आणि कलाकारांच्या यादीबाबत लवकरच अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. मराठी चित्रपटसृष्टीत असंख्य कलाकार आणि प्रेक्षक गश्मीरच्या त्याच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.