Skip to content Skip to sidebar Skip to footer

“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही…”; गिरीश ओक Sachin Pilgoankar यांच्या ट्रोलिंगबद्दल झाले व्यक्त

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांना ट्रोलिंगचा फार सामना करावा लागतो. त्यांनी स्वत: देखी ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे खरं पण त्यांच्या ट्रोलिंगला ते फारसं गांभिर्याने घेत नाहीत. परंतु, इंडस्ट्रीतील बरीच कलाकार मंडळी सचिन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ट्रोलर्सलाच बऱ्याचदा सुनावताना दिसतात. अशातच आता अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी देखील सचिन यांचया ट्रोलिंगबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. (Dr.Girish Oak)

गिरीश ओक म्हणाले की, “कमेंट करणं, ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. ही चेहरा नसलेली माणसं आहेत. त्यांना काही काम नाही म्हणून ते रिअॅक्ट करतात. वाईट कमेंट करणाऱ्या लोकांमुळे एखादा माणूस खूप डिस्टर्बही होऊ शकतो. दोनशे वाईट आणि एखादी चांगली कमेंट असते. आता ज्याप्रकारे सचिन पिळगावकरांबद्दल जे ट्रोलिंग सुरू आहे…काय आहे ते… तो माणूस वयाच्या सातव्या वर्षापासून काम करतोय. त्याच्या आयुष्यात असे अनुभव आलेलेच असणारच. त्याला तुम्ही काय बोलताय….त्याची खरंच ओळख होती…. मीना कुमारीशी, संजीव कुमारशी होती. सगळ्यांशी त्याची ओळख होती. असे अनुभवही आहेत. पण तुम्ही चेष्टाच करायची ठरवली आहे तर वाटेल ते बोलायला लागले आहेत. (Sachin Pilgoankar)

पुढे ओक असं देखील म्हणाले की, “त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही ट्रोलिंग करायला लागता. तुम्हाला एक नागरिक म्हणून काहीच वाटत नाही का? असं कोणी कसं काय करू शकतो? पण या ट्रोल करणाऱ्या लोकांना कळत नाही की खरंच एखादी व्यक्ती जर भावनिक असेल तर काय होऊ शकतं…यांच्या ट्रोलिंगमुळे काहीतरी विचित्रही घडू शकतं”…

================================

हे देखील वाचा : “त्याच्या ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का?”; पिळगांवकरांच्या ट्रोलर्सला Ashok Saraf यांनी सुनावले खडेबोल

================================

तर, अशोक सराफ यांनी देखील आपल्या मित्राची बाजू घेत ट्रोलर्सला सुनावलं होतं. ‘मुंबई तक’शी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, “निश्चितच वाईट वाटतं. कारण त्याने जे मिळवलंय ते सहजासहजी मिळवलेलं नाहीये. त्यासाठी त्याने कष्ट केलेत. त्याने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आहे. तरुणपणीच त्याने दिग्दर्शन केलंय. त्याने संगीतसुद्धा दिलंय. त्याला एडिटिंगही येतं. हे सगळे प्रकार तो स्वत: शिकला आहे. तो काय बोलतो त्याच्यावरुन त्याला ट्रोल केलं जातं. त्याच्या ज्ञानावर ट्रोलिंग होत नाही. ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का? कारण तो काय करतोय किंवा काय नाही, हे त्यांना माहितच नाही. ट्रोलिंग करणं हा एक छंद झाला आहे. ट्रोल करून लोक विसरून जातात. काही जण तर तेच शोधत असतात की हा कुठे काय बोलतोय का किंवा सापडतोय का…”. त्यामुळे नक्कीच अशोक मामांनी ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत शंकात नाही. (Ashok Saraf Reaction on Trollers)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!