Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव

मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारांची इच्छा असते की, आपणही सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारावी आणि आपल्याला देखील हिरो, हिरोइन अशी ओळख मिळावी. मात्र सगळ्यांनाच मुख्य भूमिका साकारायला मिळते असे नाही. इच्छा जरी मुख्य भूमिकेची असली तरी वाट्याला ज्या भूमिका येतील जे काम मिळेल ते करावे लागते आणि ते केलेच पाहिजे. अनेक कलाकार हे सहाय्यक भूमिकांमुळे मोठे आणि प्रसिद्ध होतात तर काही कलाकार मुख्य भूमिकांमुळे. (Ramesh Deo)

मात्र यासोबतच असे देखील अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या नकारात्मक भूमिकांमुळे लोकप्रियता मिळवली आणि याच भूमिकांमुळे ते प्रसिद्ध झाले. असेच एक अभिनेते म्हणजे रमेश देव (Ramesh Deo). मराठीमधील अतिशय प्रसिद्ध खलनायक म्हणून रमेश देव यांची ओळख होती. त्यांनी जवळपास त्यांच्या करियरमध्ये सर्वात जास्त खलनायकी भूमिकाच केल्या. रमेश यांनी मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील काम करत आपली ओळख तयार केली. (Ramesh Deo Birthday)

Ramesh Deo

अतिशय प्रभावी आणि जिवंत अभिनयासाठी रमेश देव ओळखले जायचे. त्यांनी नेहमीच आपल्या भूमिकांमधून त्यांच्यात असणाऱ्या उत्तम कलाकाराला प्रेक्षकांसमोर ठेवले. अभिनेता-दिग्दर्शक-निर्माते असलेल्या रमेश देव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सहा दशकांहून अधिक काळ आणि हिंदीमध्ये पाचपेक्षा जास्त काळ काम केले. आज रमेश देव जरी आपल्यात नसले तरी त्याचे सिनेमे आणि त्याचा अभिनय येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी अभिनयाची उत्तम शिकवणी ठरेल यात शंका नाही. आज रमेश देव यांची ९५ वी जयंती आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया रमेश देव यांच्या संपूर्ण अभिनय प्रवासाबद्दल. (Ankahi Baatein)

रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये झाला. रमेश देव हे मूळचे राजस्थानमधील होते. राजस्थानच्या जोधपूरमधील ठाकूर घराण्याशी त्यांचा संबंध होता. रमेश देव यांचे पणजोबा, आजोबा हे इंजिनियर होते. त्यानीच जोधपूरमधील पॅलेस बांधला होता. त्यांचे कौशल्य पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूर शहर वसवण्यासाठी कोल्हापूरमध्ये आमंत्रित केले. तेव्हा रमेश देव यांचे कुटुंब राजस्थानमधून कोल्हापूरमध्ये आले. रमेश देव यांचे वडील जज होते. ते शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते. (Ramesh Deo Early Life)

रमेश देव यांचं मूळ आडनाव ठाकूर असे होते. रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महाराज यांचे कायदेशीर सल्लागार होते. ते महाराजांच्या काळात त्यांना न्यायलयीन कामाकाजात मदत करीत असत. एकदा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मथु मदत केली. तेव्हा शाहू महाराज हे रमेश देव यांच्या वडिलांना उद्देशून म्हणाले होते, की तुम्ही ठाकूर नाही, तरदेव आहात. तेव्हापासून खरंतर ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना देव या आडनावानेच संबोधू लागले होते. (Entertainment Mix Masala)

Ramesh Deo

घरात कायम अभ्यासासाठी पूरक वातावरण असूनही रमेश देव यांचा कल अभ्यासाकडे कधीच नव्हता. त्यांना अभिनयात काम करायचे होते. मात्र त्यांच्या पालकांची इच्छा होती की, रमेश यांनी सैन्यात भरती व्हावे. मात्र असे होऊ शकले नाही. रमेश देव यांनी अभिनयात काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अशातच त्यांना बालकलाकार म्हणून अभिनय करण्याची संधी मिळाली. रमेश देव यांनी १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात काम केले होते. चित्रपटाची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. अभ्याससोडून ते सर्व काम करायचे. (Bollywood Masala)

एकदा रमेश देव त्यांच्या मोठ्या भावासोबत घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी गेले होते. तिथे त्यांची भेट मराठी दिग्दर्शक राजा परांजपे यांच्याशी झाली. त्या दिवशी राजा परांजपे यांनी रमेश देव यांच्या साथीने शर्यतीत २१ हजार रुपये जिंकले. रमेश देव आपल्यासाठी लकी आहेत, हे वाटल्याने राजा परांजपे यांनी रमेश यांना थेट चित्रपटाची ऑफर दिली. ही ऑफर रमेश देव यांनी स्वीकारली आणि १९५६ साली त्यांचा पहिला चित्रपट ‘आंधळा मागतो एक डोळा’ प्रदर्शित झाला. यामध्ये त्यांनी पहिलीच प्रमुख भूमिका केली होती. या चित्रपटातील त्यांचा अभिनय इतका प्रभावी होता की मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्याच सिनेमातून मोठे अभिनेते म्हणून प्रस्थापित झाले. (Marathi Latest News)

Ramesh Deo

पहिल्या हिट सिनेमानंतर रमेश देव यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तयांनी एकापाठोपाठ एक सिनेमे करण्यास सुरुवात केली. बहुत सिनेमांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका किंवा खलनायकी भूमिका साकारल्या. मात्र यातही त्यांची प्रत्येक भूमिकेतून आपली वेगळीच छाप प्रेक्षकांवर सोडली. पुढे १९६२ साली त्यांनी राजश्री प्रॉडक्शनच्या “आरती” या सिनेमातून हिंदी सिनेविश्वात पदार्पण केले. त्यानंतर १९७१ साली “आनंद” आणि “ताकदीर” या चित्रपटामुळे रमेश देव यांनी हिंदी चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण झाली. (Ramesh Deo Movie Journey)

रमेश देव यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत १५० हून अधिक मराठी आणि २०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी तीन चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती, जी समीक्षक आणि व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरली. पुढे रमेश देव यांनी दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती देखील केली. रमेश देव यांनी १००० हून नाटकांचे प्रयोग केले. सोबतच त्यांनी एक यशस्वी जाहिरात फिल्म एजन्सी देखील चालवली.

===============

हे देखील वाचा : Amol Palekar : अभिनेता अमोल पालेकर ‘यांच्या’विरुध्द कोर्टात का गेले होते?

===============

रमेश देव यांची सिने कारकीर्द कमाईची यशस्वी झाली आणि गाजली देखील याच दरम्यान त्यांना त्यांच्या आयुष्याची जोडीदार अभिनेत्री सीमा देव यांच्या रूपाने मिळाली आणि त्यांनी १ जुलै १९६३ रोजी सीमा देव यांच्याशी लग्न केले. २०१३ साली त्यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले तेव्हा त्यांच्या मुलांनी पुन्हा एकदा त्या दोघांचे लग्न लावले होते. रमेश देव आणि सीमा देव यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव ही दोन मुलं असून अजिंक्य अभिनयात तर अभिनय दिग्दर्शनात सक्रिय आहे. रमेश आणि सीमा यांनी जवळपास ७५ मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केले आहे.

Ramesh Deo

रमेश देव यांना त्यांच्या मोठ्या अभिनयातील कारकिर्दीसाठी जीवनगौरवसह अनेक लहान मोठ्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अशा या महान कलाकाराने २ फेब्रुवारी २०२३ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी सगळ्यांचा निरोप घेतला.