Skip to content Skip to sidebar Skip to footer

ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या Hina Khan ने केले टक्कल; व्हिडिओ पाहुन तुम्ही ही व्हाल भावूक

टीव्ही अभिनेत्री हिना खान तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई लढत आहे. हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे, ज्यावर ती बर्याच दिवसांपासून उपचार घेत आहे.आणि ज्यावर मात करण्यासाठी हिना खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, अभिनेत्रीने आपल्या आजाराबद्दल चाहत्यांना खूप उशिरा सांगितले, परंतु प्रत्येक कठीण काळात तिचे चाहते तिच्यासोबत राहिले आहेत. हिना या आजाराच्या तिसऱ्या टप्प्यात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती दररोज आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर हिना खानने आपले केस कापले होते. मात्र, आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक मोठं पाऊल उचलले आहे.(Hina Khan Shaved Her Head)

Hina Khan Shaved Her Head
Hina Khan Shaved Her Head

हिना तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वैयक्तिक आयुष्याशी, कॅन्सरवरील उपचार आणि केमोथेरपीशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, ज्यामुळे तिचे चाहतेही खूप भावूक होतात. हिना खान सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून या कठीण काळातही तिच्या पॉझिटिव्हिटीचा परिणाम लोकांवर झाला आहे. नुकताच हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.

Hina Khan Shaved Her Head
Hina Khan Shaved Her Head

या व्हिडिओमध्ये हिना खान तिच्या हातावर आणि उशीवर केस दाखवत आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान म्हणतेय, ”तुम्ही ते अंगीकारलं तरच तुम्ही जिंकू शकता. मला त्या टप्प्यातून जायचे नाही जिथे तूम्ही तुमच्या केसांमध्ये हात फिरवता आणि ते तुमच्या हातात येतात. त्याआधी माझ्या नियंत्रणात असलेली पावले मला उचलायची आहेत. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जर तुमचे मानसिक आरोग्य योग्य असेल तर तुमचे शारीरिक आरोग्य त्यापेक्षा 10 पट चांगले आहे.”(Hina Khan Shaved Her Head)

=============================

हे देखील वाचा: Sanjay Duttने 65वा वाढदिवसाचे स्वतःलाच दिले कोट्यवधींचे गिफ्ट;’केडी- द डेव्हिल’मधील फर्स्ट लूक ही केला शेअर

=============================

यापूर्वी अभिनेत्री हिना खानने तिचा शॉर्ट हेअर कट करातानाचा व्हिडिओ ही शेअर केला होता, ज्यामुळे तिच्या चाहत्यांचे डोळे पाणावले होते आणि आता तिच्या या व्हिडिओने तिचे चाहते अधिक भावूक झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हिनाने आता आपले केस पूर्णपणे काढून टाकले आहेत. व्हिडिओसोबत हिनाने एक अतिशय इमोशनल नोटदेखील शेअर केली आहे, जी वाचून तुम्ही ही भावूक व्हाल. व्हिडिओमध्ये ती मेकअपशिवाय आपला केस काढून टाकलेला लुक दाखवताना दिसत आहे.