Skip to content Skip to sidebar Skip to footer

Prajakta Gaikwad लवकरच अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण…

इतिहासकालीन भूमिका साकारणारी, ‘स्वराज्यरक्षक संभाजी‘ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी कारण आहे तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स , ज्या पाहून तिचं लग्न लवकरच होणार असल्याचं बोललं जात आहे. प्राजक्तानं अलीकडेच काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीत पारंपरिक लूकमध्ये दिसतेय. मात्र या फोटोंपेक्षा जास्त चर्चेत आलं ते तिचं कॅप्शन.(Prajakta Gaikwad)

Prajakta Gaikwad

“इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार आणि वयात आल्यावर लग्न कधी करणार, हे प्रश्न ठरलेले असतात.” या एकाच वाक्यानं सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या होत्या . आता चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. काहींनी तर थेट विचारलं,”मग लग्न कधी?”. यानंतर प्राजक्तानं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे . ‘पाहुणे मंडळी, ९६ कुळी मराठा’ अस कॅप्शन तिने दिल आहे, त्यात ती सोफ्यावर बसलेली दिसते, आजूबाजूला पाहुण्यांची गर्दी. “पाहुणे मंडळी, ९६ कुळी मराठा”, आणि बॅकग्राऊंडला ‘मन धागा धागा जोडतो नवा…’ हे भावनिक गाणं, या सगळ्यानं हे कांदेपोहे किंवा मुलगी बघण्याचा कार्यक्रम असावा असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे.

Prajakta Gaikwad

तिच्या या पोस्टवर  “चला तयारीला लागा!”, “अभिनंदन प्राजक्ता!”, “लग्नाचा कार्ड कुठं पाठवणार?” अशा अनेक कमेंट्स वाचायला मिळत आहेत. चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून प्राजक्तानं  पोस्ट्समधून लग्नाचा सूचक इशारा दिला असला, तरी ‘आयुष्यातला तो कोण?’ हे तिनं अद्याप उघड केलेलं नाही. त्यामुळे तिचे चाहते फारच उत्सुक आहेत हे जाणून घ्यायला की, ती खरंच लग्न करते आहे की ही फक्त फोटोशूट आहे? तिच्या आयुष्यातला जोडीदार कोण आहे? हे सगळ जाणून घेण्यासाठी. (Prajakta Gaikwad)

================================

हे देखील वाचा:  “MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !

================================

प्राजक्ताचा प्रवासाबद्दल बोलायच झाल तर इतिहास,भक्ती , आणि सशक्त स्त्री व्यक्तिरेखा प्राजक्ताने आतापर्यंत साकारल्या आहेत. तर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील येसूबाईंची भूमिका तिनं प्रभावीपणे साकारली. त्यामुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली. यानंतर ती ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत दिसली. काही वादांनंतर तिनं ही मालिका सोडली, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत असते. आता ती एका मराठी सिनेमात पोलीस अधिकारीच्या भूमिकेत झळकणार आहे. ही भूमिका तिच्या करिअरमधील नवा टप्पा ठरणार असल्याचं मानलं जातंय.