Skip to content Skip to sidebar Skip to footer

Jai Jai Swami Samarth: गर्भवती कावेरीच्या संकटावेळी दिसणार स्वामींची अद्भुत लीला; मालिकेत येणार भावनिक वळण

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ (jai jai Swami Samarth) ही लोकप्रिय धार्मिक मालिका प्रेक्षकांना नेहमीच भक्ती, चमत्कार आणि मानवी भावनांचा संगम अनुभवायला देते. मालिकेतील स्वामींच्या विविध लीलांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम टिकून असते. आता मालिकेत लवकरच एक अशी कथा पाहायला मिळणार आहे जी भावनिक, नाट्यमय आणि प्रेरणादायी ठरणार आहे. या आगामी भागात स्वामी सकाळी अचानक कोणालाही काही न सांगता स्थानावरून निघून जातात. त्यांच्या या अनपेक्षित कृतीमुळे सर्वजण चक्रावून जातात, तर कपिला त्यांचा मागोवा घेत त्यांच्यामागे निघते. स्वामी अखेर अक्कलकोटमधील एका लहानशा झोपडीपाशी पोहोचतात, जिथे गंगा आणि तिची नऊ महिन्यांची गरोदर सून कावेरी अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत असतात. (Jai Jai Swami Samarth Serial)

(ai Jai Swami Samarth Serial
Jai Jai Swami Samarth Marathi Serial

गंगाचा मुलगा सदानंद काही महिन्यांपूर्वी घर सोडून गेल्यामुळे घरातील जबाबदारी पूर्णपणे या दोघींवर आली आहे. गंगा गुडघेदुखीने त्रस्त आहे, तर कावेरी गर्भावस्थेमुळे अशक्त झाली आहे. आर्थिक अडचणी, शारीरिक वेदना आणि मानसिक तणाव अशा अनेक संकटांचा सामना करत त्या दोघी कसाबसा दिवस ढकलत असतात. अशा वेळी स्वामी त्यांच्या आयुष्यात येतात. देवाने आपल्या नशिबात काहीच दिलं नाही, अशी भावना मनात बाळगणारी गंगा संतापून स्वामींनाच प्रश्न विचारते. देवाला जर आमची काळजी असेल, तर आमच्यासोबत राहून आमचं ओझं हलकं करावं, असं ती ठामपणे सांगते. आश्चर्य म्हणजे स्वामी तिची ही विनंती शांतपणे स्वीकारतात आणि त्या घरातच राहून साध्या सेवकाप्रमाणे घरकाम करू लागतात.

(ai Jai Swami Samarth Serial
(ai Jai Swami Samarth Marathi Serial

यानंतर मालिकेत अनेक भावनिक आणि हलकेफुलके प्रसंग रंगतात. गंगा स्वामींना विविध कामे सांगते आणि स्वामी कोणतीही तक्रार न करता ती कामे करतात. कावेरीची काळजी घेणे, घरातील कामांमध्ये मदत करणे अशा प्रसंगांमधून स्वामींच्या करुणेची आणि सहानुभूतीची झलक पाहायला मिळते. दरम्यान, कपिलाला जेव्हा हे समजते तेव्हा ती संतापते. गावकऱ्यांना आणि सेवेकऱ्यांना भडकवत ती म्हणते की स्वामींचा अपमान होत आहे. मात्र स्वामी शांत आणि स्थिर राहतात. (Jai Jai Swami Samarth Serial)

=================================

हे देखील वाचा: Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज हंचनाळेची दमदार एंट्री !

=================================

कथानकाचा उत्कंठावर्धक क्षण तेव्हा येतो, जेव्हा मध्यरात्री कावेरीला बाळंत कळा सुरू होतात. गंगा गावभर सुईण शोधते, पण तिला कुणीही सापडत नाही. परिस्थिती गंभीर होत जाते आणि कावेरीच्या तसेच होणाऱ्या बाळाच्या जीवाबद्दल चिंता वाढते.अशा वेळी स्वामी आदिशक्तीचा मंत्र जपू लागतात आणि झोपडीच्या दाराबाहेरून एक दिव्य प्रकाश दिसू लागतो. हा चमत्कार पाहून गंगा आणि कावेरी स्तब्ध होतात. पुढे नेमकं काय घडणार, कावेरीचं बाळंतपण सुरक्षित पार पडणार का आणि स्वामींची ही अद्भुत लीला कशी उलगडणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठेचं ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!