Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘Big Boss Marathi’च्या घरात जान्हवी आणि आर्या एकमेकींना भिडल्या; भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी

बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला असून नवा सीझन नुकताचं सुरू झाला आहे. आपल्या रितेश भाऊने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाईलने स्वागत केलंय. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार हे प्रेक्षकांना आता पाहायला मिळतय.अल्पावधीतच या सीझनचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत.(Big Boss Marathi House Fight)

Big Boss Marathi House Fight
Big Boss Marathi House Fight

पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. आता आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. नुकतेच या घरात पहिलं नॉमिनेशन कार्य ही पार पडलं. आणि या पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल‘ अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं. आणि टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची देखील झाली. 

Big Boss Marathi House Fight
Big Boss Marathi House Fight

आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान जान्हवी म्हणते,”नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती”. त्यावर आर्या म्हणते,”माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका”. तर जान्हवी आर्याला म्हणते,”किती दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहतेस ना तेच बघते मी”. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे.(Big Boss Marathi House Fight)

=============================

हे देखील वाचा: ‘Big Boss Marathi’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य;अंकिता आणि निक्की यांच्यात होणार कडाक्याचं भांडण

=============================

आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी‘च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.‘BIGG BOSS मराठी’आपल्याला दररोज, रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि officialjiocinema वर कधीही पाहता येईल.