Skip to content Skip to sidebar Skip to footer

Kiran Mane किरण माने यांनी शेअर केली ‘मुलगी झाली हो’ मालिकेची खास आठवण

आपल्याकडे अनेकदा मराठी, हिंदी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये किंवा इथे चालणाऱ्या कामाच्या पद्धतीमध्ये अनेकदा तुलना होत असते. कोणती इंडस्ट्री कशी चांगली आहे, याबाबत अनेकदा कलाकार त्यांची मते मांडताना दिसतात. सोशल मीडियावर किंवा विविध मुलाखतींमध्ये कलाकार याबद्दल बोलतात. (Kiran Mane)

नुकतेच मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेते किरण माने यांनी देखील त्यांचे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील कलाकारांबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत किरण माने यांनी त्यांचा अनुभव सगळ्यांना सांगितला. यासोबतच एक साऊथ अभिनेत्याचे कौतुक देखील केले आहे. (Marathi Latest News)

किरण माने (Kiran Mane) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “मुलगी झाली हो’या मालिकेतली माझी विलास पाटील ही भुमिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. एक दिवस अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला, “U have acted better than me brother . Very much impressed – Sakshi Shiva” (Kiran Mane Post)

…साऊथचा एक ग्रेट ॲक्टर ‘साक्षी शिवा’ याचा तो मेसेज होता ! एका नावाजलेल्या तेलूगू अभिनेत्यानं माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला दाद दिलीय, यावर माझा विश्वासच बसंना. तो साक्षी शिवाचाच मेसेज आहे याची खात्री झाल्यावर लै लै लै आनंद झाला… काय करू, कुणाला सांगू, काय रिप्लाय देऊ काही सुचंना झालं… डोळ्यांत पाणी आलं ! (Social News)

पाच वर्षांपूर्वीची ही आठवण…

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

‘मुलगी झाली हो’ ही मालिका आधी तेलूगू मध्ये ‘स्टार मा’ वर सुरू झाली होती. ‘मौनरागम’ नावानं. साऊथला लोकप्रियतेचे सगळे उच्चांक त्या मालिकेनं तोडले होते. मी साकारत असलेली ‘विलास पाटील’ची भुमिका ‘सिनैय्या’ नांवानं तेलूगूमध्ये साकारणारा हा अभिनेता साक्षी शिवा. आपण तेलूगूत केलेला रोल मराठीत कोण करतंय या कुतूहलानं त्यानं आपली मराठी सिरियल बघायला सुरूवात केली होती…

साऊथ इंडस्ट्री का ग्रेट आहे, यावर बर्‍याचदा चर्चा सुरू असते. कारणं अनेक आहेत. पण तिथल्या अभिनेत्यांना एकमेकांविषयी आदर असणं हा गुण आपल्याला नेहमी दिसतो. साक्षी शिवानं मला मेसेज केला नसता तरी त्याच्या करीयरला काहीही फरक पडला नसता… पण तरीही त्यानं नितळ मनानं हे कौतुक केलं. आपल्याकडं समोरुन कायतरी फायदा अपेक्षित असल्याशिवाय कौतुक नसतं.

अर्थात मराठीमध्ये काही चांगले, दिलदार, प्रतिभावान, कदरदान लोकही आहेत. फक्त त्यांची संख्या आणि ताकद वाढो हीच अपेक्षा. साक्षी शिवा… लब्यु भावा.”

दरम्यान किरण माने हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून ते सतत विविध पोस्ट शेअर करत त्यांचे विचार, मत मांडताना दिसतात. उत्तम अभिनेते असलेले किरण माने यांनी राजकारणात देखील प्रवेश केला आहे. ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. किरण माने यांनी अनेक मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका केल्या आहेत.

मात्र त्यांना त्यांची ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील या भूमिकेने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात देखील घरात एन्ट्री घेतली आणि ते अंतिम फेरीपर्यंत गेले होते. त्यानंतर त्यांनी सिंधुताई सपकाळ मालिकेत काम केले. याशिवाय ते अनेक मालिकांमध्ये देखील झळकले आहेत.