Skip to content Skip to sidebar Skip to footer

Maharashtra State Marathi Film Award सोहळ्यात काजोल, अनुपम खेर यांचा सन्मान; पाहा विजेत्यांची यादी!

मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी  ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे  वितरण करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ६० व्या व ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सन २०२२ व सन २०२३ मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कार्यगटांतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा गौरव करण्यात आला.

तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना, तर स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने अभिनेत्री काजोल यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझलगायक भिमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्यामची आई या चित्रपटाचा सन्मान करण्यात आला.

६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे मानकरी

– उत्कृष्ट बालकलाकार – श्रीन‍िवास पोकळे (छुमंतर) / अर्नव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय)

– सर्वोत्कृष्ट कथा – सुमीत तांबे (समायरा)

– उत्कृष्ट पार्श्वगायक – मन‍िष राजग‍िरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे गाणे – भेटला व‍िठ्ठल माझा)

– उत्कृष्ट पार्श्वगायिका (विभागून) – आर्या आंबेकर (चंद्रमुखी) व अम‍ित घुगरी (सोयर‍िक)

– सहाय्यक अभिनेता – योगेश सोमण – (अनन्या)

– सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

– उत्कृष्ट विनोदी अभिनेता – संजय नार्वेकर (टाईमपास 3)

– उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – जयदीप कोडोलीकर (ह्या गोष्टीला नावच नाही)

– उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री –  ऋता दुर्गुळे (अनन्या)

– उत्कृष्ट अभिनेत्री – अमृता खानव‍िलकर (चंद्रमुखी) सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)

– उत्कृष्ट  अभिनेता – प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

– सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट – समायरा

– सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट दिग्दर्शक – ऋषी देशपांडे

– ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – गाभ

– ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट  दिग्दर्शक – अनुप जत्राटकर

– सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.1 – धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे

– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.1 – प्रव‍िण तरडे

– उत्कृष्ट चित्रपट क्र.2 – पॉन्डीचेरी

– उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक क्र.2 – सचिन कुंडलकर

– उत्कृष्ट चित्रपट क्र.3 – हर हर महादेव

– उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक क्र.3 – अभ‍िजीत देशपांडे

================================

हे देखील वाचा : सचिन, विजू खोटे ते एम.एस. शिंदे; Sholay चं मराठी कनेक्शन!

=================================

६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे मानकरी

-उत्कृष्ट बालकलाकार (विभागून) – कबीर खंदारे व त्रिशा ठोसर (नाळ २)

– उत्कृष्ट कथा – सुधाकर रेड्डी (नाळ २)

– उत्कृष्ट पार्श्वगायक – मोहीत चौहान (घर, बंदूक, बिर्याणी)

– उत्कृष्ट पार्श्वगायिका – ऋचा बोंद्रे (श्यामची आई)

-उत्कृष्ट संगीत – अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)

– उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – संतोष जुवेकर (रावरंभा)

– उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उषा नाईक (आशा)

– उत्कृष्ट विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये (जग्गु आणि ज्युलिएट)

– उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – निर्मिती सावंत (झिम्मा २)

– उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – दीपक जोइल (भेरा)

– प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) – श्रद्धा खानोलकर (भेरा) आणि गौरी देशपांडे (श्यामची आई)

– उत्कृष्ट अभिनेता – अमेय वाघ (जग्गु आणि ज्युलिएट)

– उत्कृष्ट अभिनेत्री – रिंकू राजगुरू (आशा)

– उत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – आशिष बेंडे (आत्मपम्फ्लेट)

-उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट -आशा

– उत्कृष्ट सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – दीपक पाटील

– उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – जिप्सी

– उत्कृष्ट ग्रामीण प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक – शशी खंदारे

– सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक १ – भेरा

– उत्कृष्ट चित्रपट क्रमांक २ – जग्गु आणि ज्युलिएट

– उत्कृष्ट चित्रपट क्रमांक ३ – नाळ २

– विशेष बालकलाकार सन्मान – भार्गव जगताप (नाळ २)