Skip to content Skip to sidebar Skip to footer

Vicky Kaushal : ‘महावतार’मध्ये झळकणार ८०० कोटींचा चित्रपट नावे असणारी मराठमोळी अभिनेत्री!

फिल्मी Background नसलेल्या Ranveer Singh याने बॉलिवूडच्या नेपो किड्सचा धुव्वा उडवला आहे… आणि याच यादीत आणखी एक नाव आवर्जून घ्यावं असा आहे अभिनेता Vicky Kaushal… ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज ही भूमिका अक्षरश: तो जिंकला आहे… आणि आता लवकरच Mahavatar या Mythological Drama चित्रपटातून प्रेक्षकांना तो अजून सरप्राईज द्यायला सज्ज झाला आहे… बऱ्याच दिवसांपासून विकीच्या ‘महावतार’ चित्रपटात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची चर्चा सुरु होती आणि आता एका नावावर शिक्का बसल्याच्या उडत्या खबरी येत आहेत… विकी सोबत एक अशी मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे जिच्या नावे ८०० कोटींचा रेकॉर्ड आहे.. कोण आहे ती जाणून घेऊयात.. (Bollywood Movie)

विकी कौशल आगामी ‘महावतार’ या चित्रपटात भगवान परशुराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे… आणि त्याच्यासोबत या चित्रपटात मॅडॉक फिल्म्सची क्वीन अभिनेत्री Shraddha Kapoor दिसणार अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत… ‘मिड-डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन यांनी ‘महावतार’मधील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची निवड केली असून तिच्याशी बोलणी सुरू केली आहे. Stree आणि Stree 2 या चित्रपटांना जागतिक पातळीवर भरघोस यश मिळवून देत ८०० कोटींपेक्षा अधिक बॉक्स ऑफिसवर कमाई करणारी श्रद्धा पौराणिक भूमिकेला न्या देऊ शकेल का हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत… (Mahavatar Movie Update)

खरं तर, विकी आणि श्रद्धा या दोन्ही कलाकारांनी बॉलिवूडला ५०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारे ग्रेट चित्रपट दिले आहेत… त्यामुळे पहिल्यांदाच जेव्हा Vicky Kaushal आणि Shraddha Kapoor स्क्रिन शेअर करतील तेव्हा नक्कीच धमाका होणार हे निश्चित आहे… अद्याप हा चित्रपट कधी भेटीला येणार हे गुलदस्त्यात आहे… कारण, सध्या विकी कौशल संजय लीला भन्साळींच्या Love & War चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी असून यात तो पहिल्यांदाच Alia Bhatt आणि Ranbir Kapoor सोबत काम करणार आहे…

तर दुसरीकडे, लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक Eetha आपल्या भेटीला येणार असून यात विठाबाईंच्या भूमिकेत श्रद्धा दिसणार आहे… Laxman Utekar हा भव्य बायोपिक आपल्या भेटीला घेऊन येणार असून यात महाराष्ट्राची शान असलेल्या लावणीचा इतिहास आणि तो कायम टिकवण्यासाठी व प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विठाबाईंनी किती कष्ट घेतले होते आणि किती खस्ता खालल्या होत्या याचं जीवंत सादरीकरण आपल्याला या बायोपिकमधून पाहायला मिळणार आहे…(Shraddha Kapoor upcoming biopic)

दरम्यान, इतर चित्रपटांप्रमाणे या देखील चित्रपटासाठी श्रद्धा कपूर मेकर्सची पहिली चॉईस नव्हती… या आधी Deepika Padukone हिची या भूमिकेसाठी निवड करण्याचा विचार सुरु होता… मात्र, तिच्या ऐवजी आता मेकर्सनी श्रद्धाचं नाव फिक्स केल्याचं समजतंय… एका मागून एक दीपिकाच्या हातून प्रोजेक्ट्स जाण्याचं कारण तिची ८ तासांच्या शिफ्टची मागणी असून शकते किंवा अजून काही हे अद्याप कोडंच आहे… परंतु, संदीप रेड्डी वांगा यांचा Spirit, Kalki 2898 AD- 2, असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स तिच्या हातून जाताना दिसत आहेत.. त्यामूळे येत्या काळात तिच्या करिअरला उतरती कळा लागणार की तिच जाणूनबुजून सिलेक्टिव्ह कामं करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे…(Deepika Padukone Controversy)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar 2 : “लाल मिर्चीने नाही,अख्ख शेत जाळावं लागेल”; दिग्दर्शकाचा ट्रोलर्सला टोला

================================

दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान याच्यासोबत King चित्रपटात ती झळकणार आहे… तर Raaka या फॅन्टसी अॅक्शन चित्रपटात ती दिसणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन Atlee करणार आहे. या चित्रपटात तिचा Co-Star असणार आहे Allu Rjun… याव्यतिरिक्त दीपिका ‘द इंटर्न’ या चित्रपटात Amitabh Bachchan यांच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार होती, परंतु काही कारणांमुळे अभिनेत्री म्हणून तिने या प्रोजेक्टमधून एक्झिट घेत निर्मात्याच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांसमोर येणार आहे…(Deepika Padukone Upcoming Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!