Skip to content Skip to sidebar Skip to footer

अशी आहे मेधा मांजरेकर आणि महेश मांजरेकर यांची ‘लव्ह स्टोरी’

बंध नायलॉनचे या चित्रपटात मेधा आणि महेश मांजरेकर यांनी एकत्र कामही केले आहे. खऱ्या आयुष्यात त्यांची पहिली भेट सुमारे 20 वर्षांपूर्वी झाली होती. तेही महेश मांजरेकर दिग्दर्शक म्हणून मेधा यांना भेटले होते त्यानेळेसची ही गोष्ट. त्यांच्या या पहिल्या भेटीची स्टोरी अत्यंत खास आहे.

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) १९९५ मध्ये ‘आई’ हा सिनेमा दिग्दर्शित करत होते. त्यावेळी एका तरूणीबरोबर त्यांची भेट झाली. ही तरूणी म्हणजेच त्यांची पत्नी मेधा मांजरेकर. (Medha Manjrekar) मेधा दिलायलाही सुंदर होती. पहिल्या भेटीतच ॲक्टर म्हणून त्यांना ती आवडली होती. तीने आपल्या सिनेमात काम करावे अशी महेश मांजरेकरांची इच्छा होती. महेश यांनी नीना कुलकर्णी यांच्याकडे मेधाचा फोन नंबर मागीतला. पण त्या मुलीचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तरीही महेश मांजरेकर यांना मेधाने आपल्या चित्रपटात काम करावे असे वाटत होते. त्यामुळे महेश मांजरेकर तिच्याशी फोनवर बोलले.  

Mahesh-Medha Manjrekar
Mahesh-Medha Manjrekar

मेधाने महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दर्शवला. पण एक अट ठेवली. मेधा त्यावेळी युरोप टूर ला जाणार होती. या टूरवरून परतल्यानंतर चित्रपटाचे शुटिंग करणार असे मेधा यांनी सांगितले. महेश मांजरेकर यांनी मेधाची ही अट मान्य केली आणि शुटिंग पुढे ढकलले. मेधाने त्यांच्या या चित्रपटात काम केले. पुढे मेधा केवळ या चित्रपटाचा भाग राहिली नाही, तर महेश मांजरेकर यांच्या जीवनाचा भाग बनली.

लग्नानंतरही मेधा यांनी महेश मांजरेकर यांच्या काकस्पर्श, दे धक्का, नटसम्राट या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या.

शब्दांकन- शामल भंडारे.