Skip to content Skip to sidebar Skip to footer

Shaitan Movie on OTT: आता घरबसल्या पाहु शकता ‘शैतान’, जाणून घ्या सर्व डिटेल्स 

शैतानअजय देवगण आणि आर माधवन यांचा चित्रपट हॅारर चित्रपट. हा सिनेमा गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रिमेक आहे. काही दिवसांपूर्वी अजय देवगण आणि आर माधवन आपला हा चित्रपट थिएटरमध्ये घेऊन आले होते. पण तुम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये पाहता येऊ शकला नसेल तर चिंता करू नका कारण आता हा सिनेमा तुम्हासा घरबसल्या पाहता येणार आहे. निर्मात्यांनी ‘शैतान’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही तो सहज पाहू शकता. ओटीटीवर ‘शैतान‘ कधी आणि कुठे पाहावा या बद्द्ल सविस्तर जाणून घेउयात.(Shaitan Movie on OTT)

Shaitan Movie on OTT
Shaitan Movie on OTT

अजय देवगण, ज्योती देशपांडे, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज, देवगण फिल्म्स आणि पॅन्रोमा स्टुडिओयांनी केली आहे. अजय देवगण आणि आर माधवन यांच्याव्यतिरिक्त ज्योतिका देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘शैतान‘ पाहण्यासाठी नेटफ्लिक्सवर जावे लागेल. अजय देवगणचा शैतान हा चित्रपट नेटफ्लिक्सवर धडकला आहे. ओटीटीने याबाबत अधिकृत पोस्टही केली आहे. 3 मे 2024 म्हणजेच कालपासून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे.

Shaitan Movie on OTT
Shaitan Movie on OTT

शैतान’बद्दल बोलायचे झाले तर विकास बहल दिग्दर्शित हा एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट होता. विकास बहल क्वीनसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. या चित्रपटात अजय देवगण, ज्योतिका, आर माधवन, जानकी बोडीवाला आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ‘वास’ या गुजराती चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.(Shaitan Movie on OTT)

==============================

हे देखील वाचा: Baahubali Crown Of Blood Trailer: ‘बाहुबली’ पुन्हा येतोय! एसएस राजमौलींनी केली मोठी घोषणा

==============================

शैतान’चा ओरिजिनल चित्रपट ‘वश’ हा जर तुम्हाला पहायचा असेल तर तो ही घरबसल्या तुम्ही पाहू शकता .’ २६ एप्रिल २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म शेमारूमीवर ‘वश’ हा सिनेमा स्ट्रीम करण्यात आला होता.