Skip to content Skip to sidebar Skip to footer

Halad Rusli Kunku Hasla मालिकेत अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे दिसणार खलनायिकेच्या दमदार भूमिकेत !

Halad Rusli Kunku Hasla‘सर्जा’ चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून, विविध चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ज्येष्ठ अभिनेत्री पूजा पवार साळुंखे आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेतून झळकणार असून, यात त्या बाळजाबाई या सत्तेची अतिशय हाव असलेली आणि धूर्त राजकारणी महिलेची भूमिका साकारणार आहेत.(Halad Rusli Kunku Hasla Serial)

Halad Rusli Kunku Hasla Serial

बाळजाबाई हे पात्र गावात मोठ्या दबदब्याचं आहे. वर वर प्रेमळ वाटणारी ही स्त्री प्रत्यक्षात अत्यंत धूर्त, पाताळयंत्री आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी आहे. गावाची सूत्रं तिच्याच हातात आहेत, आणि सरपंच पदाची निवडणूक जिंकण्यासाठी ती आपल्या मुलगा दुष्यंतचं लग्न कृष्णा या सर्वसामान्य शेतकरी मुलीशी लावण्यासही तयार आहे. अस हे बाळजाबाईचं पात्र आहे. या भूमिकेबाबत पूजा पवार साळुंखे म्हणाल्या, “या मालिकेत मी खलनायिकेची भूमिका साकारते आहे. एक अभिनेत्री म्हणून खलनायिका साकारणं हे नेहमीच आव्हानात्मक असतं. बाळजाबाईचं पात्र खूप प्रभावी आहे – दोन मुखवटे घालून जगणारी स्त्री. समाजात नम्रपणे वागणारी पण आतून अत्यंत धूर्त. तिचं बोलणं, वागणं, राहणीमान हे सगळं समजून घेत आहे. हे पात्र प्रेक्षकांच्या मनात नक्कीच ठसा उमटवेल.”

Halad Rusli Kunku Hasla Serial


या आधी पूजा पवार साळुंखे यांनी‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. जवळपास तीन वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा स्टार प्रवाहच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या मालिकेबद्दल बोलायच झाल तर, शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा आणि खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असलेला दुष्यंत अशी अत्यंत विजोड असलेली जोडी अपघाताने एकत्र येते. हा अपघात नव्या नात्याची सुरुवात असेल की अखेरची भेट याची अतिशय उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका. (Halad Rusli Kunku Hasla Serial)

================================

हे देखील वाचा: GAADI NUMBER 1760: ७७ वर्षीय अभिनेत्री सुहास जोशींनी सिनेमामध्ये केले चक्क ॲक्शन सीन्स !

================================

सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर आणि लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.  हळद रुसली कुंकू हसलंही मालिका येत्या ७ जुलैपासून दररोज दुपारी १ वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.