Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathiच्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं; कोण पडलंय कोणाच्या प्रेमात?

बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. बिग बॉस च्या घरात पहिल्याच दिवशी मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात ‘तू तू मै मै’ झालेलं पाहायला मिळाल.आणि आता रोज या घरात कोणत्या ना कोणत्या कारणांवरून स्पर्धक एकमेंकांबरोबर भिडताना दिसतात. मात्र आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरुवातीपासूनच प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत.(Big Boss Marathi 5)

Big Boss Marathi 5
Big Boss Marathi 5

अरबाज आणि निक्कीची स्ट्राँग मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ शकतं असा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला. त्यानंतर रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुललेलं दिसून आलं. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण आणि इरिना रूडाकोवा यांच्यात लव्ह केमिस्ट्री फुलू शकते, असे म्हटले जाऊ लागले. अशातच आता रॅपर आर्या देखील वैभवच्या प्रेमात पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आर्याचा हार्टब्रेक होणार की वैभव तिचं प्रेम स्वीकारणार? हे येणारा काळच ठरवेल.

Big Boss Marathi 5

बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव आणि इरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. दरम्यान वैभव म्हणतो,”कसली क्यूट आहे यार ही”. पण दुसरीकडे आर्या मात्र हार्टब्रेक झाल्याने ओक्साबोक्शी रडताना दिसत आहे. पुढे वैभव आर्याला विचारतो,”काय विषय आहे नक्की?”. त्यावर आर्या म्हणते,”मला तू नॅचरली अॅटरॅक्टिव्ह वाटतो”. यावर वैभव म्हणतो,”मी तर तुला असं कोणतं इंटेंशन दिलेलं नाही”. पण आर्या म्हणते,”मला होऊ शकतं अॅटरॅक्शन”.(Big Boss Marathi 5)

===============================

हे देखील वाचा: वाढदिवसाच्या निमित्ताने प्राजक्ता माळीने केली मोठी घोषणा…

===============================

बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहावे लागेल.‘BIGG BOSS मराठी’ आपल्याला रोज रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि विनामूल्य officialjiocinema वर पाहता येईल.