Skip to content Skip to sidebar Skip to footer

Raja Shivaji ३०० कोटी कमावणार…!

सध्या सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या नजरा एकाच चित्रपटाकडे आहेत, तो म्हणजे रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित बिग बजेट ऐतिहासिकपट ‘राजा शिवाजी’ ! गेले २-३ वर्ष तो या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतोय… चित्रपटाच्या सेट्सवरचे काही फोटोही मध्यंतरी सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.. इतकंच नाही तर राजाशिवाजी चित्रपटातील जबरदस्त स्टारकास्ट रिव्हील केल्यानंतर राडाच झाला होता… आजवर बऱ्याच हिंदी कलाकारांनी मराठीत छोटी मोठी कामं केली आहेतच पण, म्हणायचं झालं तर पहिल्यांदाच इतकी मोठी बॉलिवूडची स्टारकास्ट आपल्या मराठीत दिसणार आहे. एकदा स्टारकास्टवर नजर टाकूया… छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत रितेश देशमुख… जीवा महाला यांच्या भूमिकेत आहे सलमान खान… अफझल खानची भूमिका साकारतोय संजय दत्त… राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या भूमिकेत आहे भाग्यश्री पटवर्धन… या भूमिका आणि कलाकार निश्चित आहेतच… (Marathi Historical Movie)

आता राजा शिवाजी चित्रपटात संभाव्य कलाकार कोणती भूमिका साकारतील यावर एक कटाक्ष टाकूयात… शहाजी राजे यांच्या भूमिकेत महेश मांजरेकर दिसू शकतात. मिर्झा राजे जयसिंग यांची भूमिका अभिषेक बच्चन साकारू शकतो, दादोजी कोंडदेव यांची भूमिका सचिन खेडेकर यांच्याकडे असू शकते, शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या भूमिकेत जिनिलिया देशमुख दिसू शकते… याव्यतिरिक्त फरदीन खान, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी हेसुद्धा प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. आता इतकी मोठी स्टारकास्ट असल्यावर बजेट तर खूपच जास्त असणार हे नक्की… ‘राजा शिवाजी’चं बजेट ५० ते ७० कोटींच्या दरम्यान असल्याचं म्हटलं जात आहे… आतापर्यंत रितेशचाच ‘वेड’ आणि प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हे दोनच मराठीत सर्वात जास्त बजेट असलेले मराठी चित्रपट येऊन गेले… दोघांचं बजेट जवळपास १५ कोटी होतं. पण आता ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं बजेट या दोन्ही चित्रपटांच्या जवळपास चार पटीने जास्त असून मराठीत हा भव्य चित्रपट बनवण्याचं धनुष्य रितेशने आपल्या खांद्यावर पेललं आहे…(Chhatrapati Shivaji Maharaj)

महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्येही रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटाकडे फक्त १०० नाही तर २०० तर नाहीच नाही… थेट ३०० कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे… आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची लिस्ट पाहिली तर ११० कोटींसोबत पाहिल्यावर आहे ‘सैराट’, दुसऱ्यावर ९२ कोटींसोबत ‘बाईपण भारी देवा’, तिसऱ्यावर ७५ कोटींसोबत आहे ‘वेड’… चौथ्यावर ७५ कोटींसोबतच आहे ‘पावनखिंड’… आणि पाचव्यावर आहे ‘नटसम्राट’ ज्याने ५० कोटी कमावले होते. (Marathi Movie Box Office Collection)

सिंगल डे कलेक्शनच्या बाबतीत ‘बाईपण भारी देवा’ आहे, ज्याने तब्बल ६.१० कोटी रुपये कमावले होते… तर दुसऱ्यावर आहे आहे रितेशचा ‘वेड’ ज्याने ५.७० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे कमाईच्या बाबतीत, बजेटच्या बाबतीत सगळीकडेच TOP वर रितेशच आहे. मराठीत त्याचा मोठा चाहतावर्ग आहे… सोबत बॉलीवूडवमध्येही त्याची चांगली पकड आहे… त्यामुळे ‘राजा शिवाजी’ ३०० कोटींचा पल्ला गाठू शकतो, हे तर जवळपास निश्चितच मानलं जात आहे. अजून एक खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनी रिलीज होणार आहे…

================================

हे देखील वाचा : जीवा महाला-सलमान खान, अफझल खान-संजय दत्त; Riteish Deshmukhचा ‘राजा शिवाजी’ चालणार का?

================================

मराठीत फर्स्ट डे कलेक्शनच्या बाबतीत ‘सैराट’ अजूनही TOP वर आहे ज्याने ४.२३ कोटी कमावले होते. पण ‘राजा शिवाजी’ फर्स्ट डेमध्येच तब्बल २० कोटींच्या पार जाऊ शकतो… दुसरीकडे पाहायचं झालं तर ‘राजा शिवाजी’ला मे मध्ये कॉम्पिटीशन देऊ शकेल, असा एकही हिंदी किंवा साउथचा चित्रपट अद्याप तरी नसल्यामुळे महाराष्ट्रात तर ‘राजा शिवाजी’ बक्कळ कमाई करणार हेच चित्र दिसून येत आहे… मराठीत सहसा बजेट, स्टारकास्ट, सिनेमेटोग्राफी अशा अनेक गोष्टींवर लिमिटेशन असायचं.. पण रितेशने ही सगळीच बंधनं मोडून काढली आहेत. त्यामुळे आता ‘राजा शिवाजी’ मराठीत एक वेगळा माईलस्टोन गाठणार हे नक्की!

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi