Skip to content Skip to sidebar Skip to footer

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय आणि उत्कंठेची घडणार मराठी सफर!  

Samsaara Movie: मराठी सिनेसृष्टीत हॉररपटांचं प्रमाण तुलनेनं कमी असतानाच, त्यामुळे ‘समसारा‘ या आगामी चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि भय यांचा सुरेख मिलाफ सादर करणारा नवा सिनेमा ‘समसारा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्यानेच प्रेक्षकांच्या मनात एक गूढ वाट निर्माण केली होती. आता नुकताच या सिनेमाचा लाँच झालेला ट्रेलर प्रेक्षकांना आणखी खोलात घेऊन जातो आहे आणि त्यातूनच कथानकाच्या अनेक अंगांची झलक दिसते आहे. (Samsaara Marathi Movie Trailer)

समसारा’ ही जन्म आणि मृत्यूच्या मधल्या अस्पष्ट अवस्थेवर आधारित असलेली एक रहस्यपूर्ण गोष्ट आहे. ही कथा केवळ भीती निर्माण करणारी नाही, तर ती मानवी भावनांच्या गुंतागुंतीला स्पर्श करते. सायली संजीव, ऋषी सक्सेना, डॉ. गिरीश ओक आणि पुष्कर श्रोत्री यांसारखे कसलेले कलाकार या गोष्टीत प्राण फुंकताना दिसत आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये दडलेला भूतकाळ आणि त्यात असलेलं गूढ ट्रेलरमध्येच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतं.

=================================

हे देखील वाचा: Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी’ २०२६ मध्ये होणार प्रदर्शित!    

=================================

चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे यांनी केलं असून, त्यांना कथानक आणि पटकथेच्या माध्यमातून समीर मानेकर आणि विश्वेश वैद्य यांची साथ लाभली आहे. संवादही समीर मानेकर आणि निहार भावे यांनी लिहिले असून, त्यांनी पात्रांच्या भावभावनांना साजेशी भाषा वापरली आहे. पार्श्वसंगीत आणि छायांकनाचाही विशेष उल्लेख करावा लागेल, कारण ट्रेलरमधील दृश्यं आणि आवाज यांची सांगड ही एक वेगळीच अनुभूती देणारी आहे.

Samsaara Movie Trailer

समसारा’ची निर्मिती संचय प्रॉडक्शन्सचे पुष्कर योगेश गुप्ता यांनी केली असून महेश भारंबे आणि अन्वय नायकोडी यांनी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. छायाचित्रणाची बाजू अक्षय राणे यांनी तर संगीताची जबाबदारी विश्वेश वैद्य यांनी सांभाळली आहे. ही संपूर्ण टीम एकत्र येऊन एक भीतीदायक, उत्कंठावर्धक आणि वेगळी अशी सिनेमॅटिक सफर घडवून आणते आहे.(Samsaara Trailer Out)

==================================

हे देखील वाचा: ‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि अँथनीची धमाकेदार गोष्ट येतेय भेटीला! 

==================================

मराठी चित्रपटांमध्ये हॉरर शैली क्वचितच हाताळली जाते. त्यामुळे ‘समसारा’ हा चित्रपट केवळ एक चित्रपट न राहता, मराठी सिनेमाला एक वेगळी दिशा देणारा प्रायोगिक प्रयोग ठरण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना ट्रेलर पाहूनच समजत की ही गोष्ट फक्त पडद्यावरच अनुभवायला हवी. तर, भीती आणि रहस्य यांच्या या अनोख्या प्रवासासाठी प्रेक्षकांना २० जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ‘समसारा’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तो मोठ्या पडद्यावर पाहणं निश्चितच आवश्यक ठरणार आहे.