Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘आई-मुलीच्या नात्याचा सुरेल स्पर्श’, Avdhut Gupte  यांचं ‘सांग आई’ गाणं झालं प्रदर्शित!

Avdhut Gupte:  आई आणि मुलगी यांचं नातं हे शब्दांपलीकडचं असतं. आईच्या सावलीत वाढणारी मुलगी हळूहळू तिचंच प्रतिबिंब बनते. तिचं बोलणं, चालणं, घराची काळजी घेणं अगदी आईसारखं असतं. हे नातं एकदा रुसव्यात गुंततं तर कधी स्नेहात विरघळतं. याच भावनांचा सूक्ष्म आणि हृदयस्पर्शी वेध घेत अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या ‘आई’ या अल्बममधील शेवटचं गाणं ‘सांग आई (Sang Aai Song) सादर केलं आहे. (Avdhut Gupte )

Avdhut Gupte

एकविरा म्युझिक प्रस्तुत (Ekvira Music) या गाण्याचं संगीत आणि गायन स्व:तहा अवधूत गुप्ते यांचं आहे, तर अर्थपूर्ण आणि भावनिक शब्द प्रशांत मडपुवार (Prashant Madpuwar) यांनी लिहिले आहेत. संगीत संयोजन अनुराग गोडबोले (Anurag Godbole) यांनी केले असून, दिग्दर्शन शोनील यलट्टीकर यांचं आहे.

Avdhut Gupte

गाण्यात पूर्णिमा डे आणि लहान वयातच अभिनयात पदार्पण करणारी मायरा स्वप्नील जोशी (Mayra Swapnil Joshi) या मायलेकीच्या भूमिकांमध्ये झळकतात. मायरा ही प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांची कन्या असून, या गाण्यातून तिने कलाक्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे. तिचा सहज अभिनय, डोळ्यांतून दिसणारा भाव, आणि आईसारखं वागण्याचा प्रयत्न यामुळे ती रसिकांच्या मनात घर करून जाते. (Avdhut Gupte )
===============================

हे देखील वाचा: Rekha : ‘उमराव जान’ ४४ वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘या’ दिवशी होणार री-रिलीज! 


===============================

‘सांग आई’ बद्दल भावना व्यक्त करताना अवधूत गुप्ते म्हणतात की, “ही भावना माझ्या मनाच्या खूप जवळची आहे. मायरा ही फक्त स्वप्नीलची मुलगी म्हणून नव्हे, तर तिच्या सहज अभिनयामुळे या भूमिकेसाठी परिपूर्ण होती . ‘सांग आई‘ ही मुलगी आईला विचारते, तिला समजून घेते आणि तिच्यासारखी बनण्याचा प्रयत्न ही करते , हाच माझा या गाण्यामागचा खरतर भाव होता.” गाण्याच्या दर प्रत्येक फ्रेममध्ये दिसणारी सौंदर्यपूर्ण दृश्यसंयोजना, उत्कट भावनांची मांडणी आणि अर्थात सुरेल संगीत यामुळे ‘सांग आई’ हे गाणं फक्त ऐकायचंच नाही तर अनुभवायचं आहे.