Skip to content Skip to sidebar Skip to footer

शहनाज गिलला नवरीसारख नटलेल पाहून; नेटकऱ्यांना आली सिद्धार्थ शुल्का ची आठवण 

शहनाज गिल अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांसाठी प्रेम आणि आदर पाहायला मिळतो. शहनाजच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ती सलवार सूटपासून ते अगदी वेस्टर्न ड्रेसमध्ये सगळ्यांनी पाहिल आहे. दरम्यान, तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जे पाहून तिचे चाहते खुप खूश झाले आहेत. या देसी स्टाईलसह शहनाजचा खोडसाळ लूक चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. या लूकमध्ये शहनाज गिल खूपच क्यूट दिसत आहे, तिच्या या लुकवर चाहते आपली प्रतिक्रिया ही देत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शहनाज गिल गाजर रंगाच्या लेहंगामध्ये दिसत आहे. शहनाजने डोक्यावर ओढणी घातली आहे आणि मेकअप केला आहे. या दरम्यान तिचा खोडसाळपणाही दिसून येत आहे.(Shehnaaz Gill Bridal Look)

Shehnaaz Gill Bridal Look
Shehnaaz Gill Bridal Look

व्हिडिओच्या सुरुवातीला शहनाज शांत बसलेली दिसत आहे, बॅकग्राऊंडमध्ये ‘है तमन्ना हम तुम्हे दुल्हन बनाया’ हे गाणे वाजत आहे, मग ती थोडी हसते आणि लाजताना दिसते. त्यानंतर शहनाज हातावरची मेहंदीही दाखवते. यानंतर ती तिची नथ नीट करते आणि मग शहनाजची चुलबुली स्टाईल समोर येते. कधी शहनाज डोळे फिरवताना दिसते, तर कधी तिचे तोंड मुददामुन वाकडे करते. चाहत्यांना तिची ही स्टाईल खूप आवडली आहे. शहनाजला वधूच्या रूपात पाहून तिचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसले की एक दिवस ती जगातील सर्वात सुंदर वधू बनेल. एका यूजर ने लिहिले आहे- ‘मी प्रार्थना करतो कि एक दिवस तु खुप सुंदर वधू बनशील. तर एकाने लिहिलं आहे,’शहनाज, तू इतकी साधी सुंदर दिसतेस, तू खरंच वधू झाल्यावर कशी दिसशील.’ तर अजून एकाने लिहिलं आहे की,’तुला वधूच्या रुपात पाहून सिडची आठवण झाली”

Shehnaaz Gill Bridal Look
Shehnaaz Gill Bridal Look

सोशल मीडियावर एका युजरने लिहिले की, ‘आम्हाला तुला सिडसोबत असे पाहायचे होते’. तर आणखी एकाने लिहिले की, ‘काश हे खरे होऊ शकले असते’. तर काही लोक असेही म्हणत आहेत की असे व्हिडिओ अपलोड केल्याने शहनाजच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्यामुळे अॅडमिनने असे व्हिडिओ अपलोड करू नयेत. इतकंच नाही तर काही लोक या व्हिडिओला शहनाजचा लेटेस्ट व्हिडिओ मानत आहेत. एकाने कमेंट केली, “सिडला इतक्या लवकर विसरलो. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती.” (Shehnaaz Gill Bridal Look)

========================

हे देखील वाचा: ५०० रुपयांच्या गजऱ्याचे अमिताभ बच्चन यांनी दिले ५ हजार रूपये; कारण ऐकून तुम्ही ही कराल कौतुक

========================

शहनाज गिलचा हा ब्राइडल लूक सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. बिग बॉस 13 मधून प्रसिद्ध झालेली शहनाज गिलने सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. आपल्या चॅट शोमुळेही ती दररोज चर्चेत असते.