Skip to content Skip to sidebar Skip to footer

Charak : ‘द केरला स्टोरी’ दिग्दर्शकाचा चित्रपट आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गाजवून भारतात प्रदर्शनासाठी सज्ज

अदा शर्मा हिची प्रमुख भूमिका असणारा आणि केरळ मधील भयाण वास्तव सांगणारा ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट २०२३ मध्ये आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर सुदीप्तो यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून लवकरच ‘सिपिंग टी सिनेमा’ या आपल्या नव्या बॅनर अंतर्गत चरक चित्रपट घेऊन येत आहेत. (Entertainment news)

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गाजवलेला ‘चरक – फेअर ऑफ फेथ’ चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. ‘चरक’ ही एक भारतीय लोककथेवर आधारित हॉरर फिल्म असून नक्कीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळा आशय या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. (Upcoming movies)

‘चरक’ चित्रपटाची कथा पश्चिम बंगालमधील पारंपरिक चरक पूजेच्याभोवती घडते. भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या पूजेमागे दडलेली अमानवी परंपरा, शरीराला वेदना देणारे रूढी आणि अंधश्रद्धेची तीव्रता यावर चित्रपटातून प्रकाश टाकला जातो. अंधश्रद्धेच्या अंधारात गुरफटलेल्या समाजाचं भयाण वास्तव मांडते. (Bollywood update)

================================

हे देखील वाचा: India Pak Conflict : भारताचा पाकिस्तानवर Digital Strike; पाकिस्तानी कलाकारांचे अकांऊंट्स ब्लॉक

=================================

‘चरक – फेअर ऑफ फेथ’ लोककथेच्या माध्यमातून सांगितलेली ही कथा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वेदनांचा आणि अज्ञानाचा पट मांडणारा चित्रपट आहे. चित्रपटातील स्त्री पात्रांचे मौन, त्यांच्या वेदनांचे प्रतिबिंब, आणि एकूणच लोकसंस्कृतीतील विसंगती या चित्रपटात दाखवण्यात आला असून आता प्रेक्षक याकडे कसे पाहतात आणि प्रतिक्रिया काय येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (Indian cinema)