Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘फकाट’ सिनेमाच्या शूट दरम्यान सुयोग गोऱ्हे ने रसिका सुनील ला केले किस आणि… 

हल्ली एखाद्या सिनेमात किंवा वेबसिरिज मध्ये गरज असेल तिथे किसिंग सीन्स किंवा मग त्यापेक्षा ही थोड्या जास्त गोष्टी दाखवल्या जातात. प्रेक्षक ही या गोष्टी स्वीकारताना दिसतात, मात्र पडद्यावर किसिंग सीन देणे, ही आता फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. कलाकारही सिनेमाचा भाग म्हणून असे सीन करण्यास तयार होतात. परंतु ‘हे’ असं करण्यासाठी सगळेच कलाकार कम्फर्टेबल असतात, असे नाही. असाच एक किस्सा ‘फकाट’च्या चित्रीकरणादरम्यान सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनीलसोबत घडला. चित्रपटात सुयोगला रसिकाला किस करायचे होते, मात्र असा सिन करण्याकरता तो खूप अनकम्फर्टेबल झाला होता. हा सीन करणे सुयोगला खूपच अवघड जात होते, कारण यापूर्वी त्याने किसिंग सीन कधीच केला नव्हता. मात्र या सगळ्यात त्याला त्याची सहकलाकार रसिका सुनीलने साथ दिली आणि अखेर तो सीन चित्रित झाला. हा सीन कसा चित्रित झाला याचा किस्सा रसिकानेच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(Rasika Sunil Kissing Scene)

Rasika Sunil Kissing Scene
Rasika Sunil Kissing Scene

या सीनबद्दल रसिका सुनील म्हणाली,”असा सीन करायचा आहे हे जेव्हा सुयोगला कळले, तेव्हा तो खूप घाबरला कारण आधी त्याने असा सीन कधीच दिला नव्हता. मी हा सीन करण्यासाठी कम्फर्टेबल होते, मला काहीच अडचण नव्हती. पण सुयोगला हे जरा विचित्र वाटत होतं. त्याला मी सांगितलं आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कामाच्या बाबतीत प्रोफेशनलही आहोत, त्यामुळे हा सीन करायला तुला एवढं अनकम्फर्टेबल व्हायची गरजच नाही. तेव्हा आमच्या दोघांचं लग्न झालं नव्हतं. तरीही त्याला हे करायला खूप दडपण येत होतं. अखेर मी आणि दिग्दर्शक श्रेयश जाधवने भरपूर समजवल्यानंतर किसिंग सीन देण्यासाठी तो  तयार झाला आणि हा सीन चित्रित झाला. 

Rasika Sunil Kissing Scene
Rasika Sunil Kissing Scene

आता आमच्या दोघांचंही लग्न झालं आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं तू किसिंग सीन दिला आहेस तर तुझा नवरा तुला काही बोलला नाही का?. त्यावर मी एकच सांगेन, माझं क्षेत्र काय आहे, हे माझ्या नवऱ्याला माहित आहे. त्यामुळे इथे भूमिकेची गरज म्हणून हे सगळं करावं लागतं. याची त्याला पूर्ण कल्पना आहे.” (Rasika Sunil Kissing Scene)

=================================

हे देखील वाचा: राव आणि रंभाची ऐतिहासिक प्रेमकथा रुपेरी पडद्यावर झळकणार

=================================

वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित ‘फकाट’ या चित्रपटात हेमंत ढोमे, अनुजा साठे, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्याही प्रमुख भूमिका असून हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. येत्या २ जूनला रसिका आणि सुयोगमधील हा रोमान्स आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे .