Skip to content Skip to sidebar Skip to footer

Swapnil Joshi ने करिअरमध्ये घेतला मोठा निर्णय; सोशल मिडियावर केली घोषणा

मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी याने नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे… बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या स्वप्नीलने श्रीकृष्ण मालिकेतील श्रीकृष्ण असो किंवा ‘दुनियादारी’मधील श्रेयस असो त्याने प्रत्येक भूमिका सुंदर वठवली… आता लवकरच स्वप्नील नव्या प्रोजेक्टमधून भेटायला येणार असून तो चक्क रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे..

स्वप्नील जोशी जवळपास दशकभरानंतर स्वप्नील ‘लग्न पंचमी’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. य़ा नाटकात त्याच्यासोबत अमृता खानविलकर असूनन तिचं रंगभूमीवर या नाटकातून पदार्पण आहे… दरम्यान, स्वप्नीलने सोशल मिडियावर खास पोस्ट करुन त्याच्या चाहत्यांना ही खास बातमी दिली होती…

स्वप्नीलनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नमस्कार, खूप दिवसांनी तुमच्याशी असा ऑडिओमधून संवाद साधतोय. मी वयाच्या नवव्या वर्षी काम सुरू केलं. मालिकांमधून काम सुरू झालं. म्हणजे उत्तर रामायण, श्रीकृष्ण या मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर ‘अमानत’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘कहता है दिल’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. रिअ‍ॅलिटी शोमध्येही काम केलं. ‘कॉमेडी सर्कस’, ‘फू बाई फू’ सारख्या शोमध्ये काम केलं आणि हा प्रवास असा अविरत सुरू राहिला. उत्तम सुरू आहे. ‘दुनियादारी’, ‘मितवा’ ते ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘वाळवी’, ‘जिलेबी’ अशा अनेक चित्रपटांतही काम केलं. पण, या सगळ्या प्रवासामध्ये मराठी माणूस मराठी कलाकाराला सातत्याने एक प्रश्न विचारतो, जो प्रश्न मलाही माझ्या रसिक प्रेक्षकांनी वारंवार विचारला, विचारत आहेत. मला असं वाटलं की हा प्रश्न रास्त आहे, योग्य आहे. आता बहुतेक त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली. उत्तर द्यायला लागणार, तुमचाच स्वप्नील”. हा ऑडिओ शेअर करत स्वप्नीलने ‘मी……बाकी उद्या सांगतो !!!’ असं कॅप्शन लिहिलं होतं.

त्यानंतर, स्वप्नीलने पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीकडे वळत असल्याची घोषणा केली. तो म्हणाला की, “हे केवळ नाटक नसून कलाकार म्हणून स्वतःला पुन्हा नव्यानं घडवण्याचा प्रवास असल्याचं” मुंबई टाइम्सशी बोलताना त्यानं सांगितलं. जवळपास एका दशकानंतर तो परत एकदा नाटकात दिसणार असल्यामुळे चाहत्यांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी स्वप्नीलनं चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत ‘गेट वेल सून’ हे नाटक केलं होतं.

=============================

हे देखील वाचा:  Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव देणाऱ्या’असंभव’चा ट्रेलर प्रदर्शित !  

=============================

दरम्यान, ‘लग्न पंचमी’ या नाटकाच्या लिखाणाची जबाबदारी लेखीका मधुगंधा कुलकर्णीने सांभाळली असून, दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीचे आहे. २०२६च्या सुरुवातीला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीनं मांडणारं हे नाटक आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi