२०१८ साली आलेल्या ‘आपला मानूस’ या चित्रपटात घरात एकटी राहणारी वृद्ध माणसं आणि त्यांच्या समस्यांवर रहस्यमय पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. आबा गोखले हे राहत्या घराच्या बाल्कनीमधून खाली पडतात. आता हा अपघात असतो, आत्महत्या असते, की खून, या प्रश्नाभोवती चित्रपटाचं कथानक फिरत राहतं.