ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले…