आपल्या गायकीने संपूर्ण भारत वर्षात सर्वाधिक गाणी गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करणारा गायक म्हणजे एस पी बालसुब्रमण्यम (S. P. Balasubrahmanyam). त्यांनी भारतातील सोळा भाषांमधून तब्बल चाळीस हजाराहून अधिक गाणी गायली.
संस्कृती कलादर्पण या पुरस्काराच्या नावाच्या मालकीवरून संस्कृती कलादर्पणचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि संस्कृती कलादर्पणच्या विद्यमान अध्यक्षा अर्चना नेवरेकर यांच्यात वाद पेटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे शीतयुद्ध चालू होतं.
भारतीय चित्रकर्मींचा हुरूप वाढवणारा ६७वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा (67TH NATIONAL FILM AWARDS) नुकताच पार पडला. चित्रपट महोत्सवाचे अतिरिक्त संचालक चैतन्य प्रसाद, दिग्दर्शक - सिनेमॅटोग्राफर शाजी करूण, दिग्दर्शक-निर्माते एन. चन्द्रा, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर अरुण चढ्ढा, नामांकित समीक्षक आणि लेखक सैबल चटर्जी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, विविध भाषांमधल्या तब्बल ४६१ चित्रपट आणि…
२०१९मध्ये आपल्या दर्जेदार कलाकृतींमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा फिल्मफेअर ॲवॉर्ड शो नुकताच पार पडला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती असलेला हा कौतुकसोहळा आपल्या मायमराठीची मान उंचावणारा ठरला. ‘फत्तेशिकस्त’, ‘बाबा’, ‘आनंदी गोपाळ’, ‘कागर’, ‘खारी बिस्कीट’, ‘हिरकणी’, ‘गर्लफ्रेंड’, ‘ट्रिपल सीट’, ‘मोगरा फुलला’ इत्यादी एकाहून एक सरस अश्या कलाकृतींचा ह्या मंचावर यथोचित सन्मान केला गेला. ‘फास्टर फेणे'च्या…
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागलं आणि घड्याळाच्या काट्यांवर धावणारी दुनिया घरात कैद झाली. या महामारीच्या ताणतणावापासून दूर राहण्यासाठी लोकांनी मनोरंजन विश्वाला जवळ केलं. जुन्या मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोज पुन्हा एकदा टीव्हीवर बघता येऊ लागले. थिएटर्स बंद असल्यामुळे चित्रपट व्यावसायिकांसमोर मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. त्यावरही मात करत त्यांनी 'ओव्हर द टॉप' अर्थात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचा आधार घेत…