भारतीय चित्रपटाच्या सुवर्णकाळात अनेक संगीतकार होऊन गेले; ज्यांनी भारतीय चित्रपट संगीत आपल्या दर्जेदार सुरावटींनी समृद्ध केलं. त्या काळात कलावंतांना परस्परांच्या कलेबाबत कामाबाबत कमालीचा आदर असायचा. त्या काळात स्पर्धा नक्कीच असायची पण ती निकोप असायची. कुठेही कुणी कुणावर कुरघोडी करत नसे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट असं कलेचे रूप रसिकांच्या पुढे यायचं. एकदा एस एम नायडू या दक्षिणात्य निर्मात्याने…