बॉलीवूड आणि बायोपिक… ही सध्या एक नेव्हर एंडिंग लव्ह स्टोरी झालेली आहे. दरवर्षी डझनभर बायोपिक भारतात रिलीज होतात. काही चालतात तर काहींचा बाजारच उठतो. तसं स्पोर्ट्सवर आधारित बरेच बायोपिक आले, पण सर्वात जास्त मार्केट खाल्लं, क्रिकेटवर आधारित चित्रपटांनी ! तसं तर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' चित्रपटाने क्रिकेटवर आधारित चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवली, पण त्यानंतर आलेले अनेक…
मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा हटके अंदाजात दिसणार आहेत. आगामी ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे भाईगिरी करताना दिसणार आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा…
नव्वदच्या दशकामध्ये अभिनेता गोविंदा याची प्रचंड मोठी चलती होती. कॉमिक सेन्स, अनोख्या डान्स स्टेप्स आणि गाणी यामुळे गोविंदा या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्याच्यावर पिक्चराईज झालेली गाणी आज देखील खास आठवले जातात. ‘मै तो रस्ते से जा रहा था मै तो भेल पुरी खा रहा था’ , ‘अखियो से गोली मारे’, ‘मय से मीना…
हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण काळातील एक प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, प्रत्येक शॉट हा परफेक्टच असला पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा आणि त्या पद्धतीने ते कलाकारांकडून काम देखील करून घ्यायचे. त्यामुळेच आज साठ-सत्तर वर्षे झाली तरी ‘दो भीगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता, बंदिनी…. या चित्रपटातील प्रत्येक शॉट रसिकांच्या नजरेसमोर आहे. या चित्रपटातील कुठलेही…
मायकल जॅक्सनचे (Michael Jackson) जगभरात चाहते आहेतच पण भारतात विशेष फॅन क्लब जॅक्सनचा आहे. १९९६ मध्ये मायकल जॅक्सन 'World Tour' वर होता त्यादरम्यान तो भारतात आला असता त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या स्वागताला अख्ख्या बॉलिवूडमधून केवळ अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एअरपोर्टवर गेली होती. आता तब्बल…
बॉलिवूडचा ९०चा आणि २०००चा सुरुवातीचा काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे (Sonali Bendre). कॅन्सरचं निदान झाल्यानंतर परदेशात उपचारासाठी गेलेली सोनाली बेंद्रे पुन्हा चित्रपटात काही दिसलीच नाही. पण ९०चं दशक आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी सोनाली आणखी एका कारणामुळे विशेष चर्चेत होती. आणि ते कारण म्हणजे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचं नातं. काही महिन्यांपूर्वी…
चंदेरी जग म्हटलं की स्टारडम आलं, आणि स्टारडम म्हटलं की चाहते आलेच. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना (Ranjana Deshmukh) अशा बऱ्याच मोठ्या कलाकारांना चाहत्यांचे भयानक अनुभव आले आहेत. नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीला चक्क याच कारणामुळे आपली ओळख आणि चेहरा लपवण्यासाठी परीक्षेला जाताना…
सध्या ओटीटीवरील कोरियन वेब सीरीज किंवा चित्रपट फारच ट्रेंण्डींग आहेत. लोकांना अक्षरश: भंडावून सोडणारी 'स्क्विड गेम' ही वेब सीरीज आता लवकरच तिसरा आणि फायनल सीझन भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी उत्कंठा वाढवणारा ‘स्क्विड गेम ३’ (Squid Game 3) चा टीझर रिलीज झाला होता. आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक शिगेला पोहोचवणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Entertainment update)…
‘मारुती कांबळेचं काय झालं?’ आजही ५० वर्षांनी ‘सामना’ (Samana Movie) चित्रपटातील मारुती कांबळेबद्दल प्रश्न पडतोच... खरचं विजय तेंडूलकर यांच्या सामाजिक आणि राजकीय विषयांच्या सखोल अभ्यासातून ‘सामना’ चित्रपटाची कथा लिहिली गेली.. विशेष म्हणजे रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या नवख्या चित्रपट दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तेंडूलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सामना’ सारखा अतिशय संवेदनशील चित्रपट डॉ. जब्बार पटेल…
बॉलिवूड इंडस्ट्री जगभरात एका नावामुळे विशेष ओळखली जाते ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). खरं तर पहिला चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या अमिताभ यांना आता दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपड करतान दिसतात. वय वर्ष ८२ असूनही बिग बी आजही लिड रोल करताना दिसतात. आता जरा का तुम्हाला असं सांगितलं की आताच्या नावाजलेल्या एका…