चित्रपटाच्या इतिहासात डोकावताना कधी कधी काही वेगळेच घडल्याचे दिसते. आणि तीच चित्रपटाच्या ‘खेळी’ तील गंमत जंमत आहे. त्यातला एक फंडा म्हणजे, एकादा चित्रपट फारशी टामटूम न करता, ढीगभर मुलाखतीचे वाटप न करता पडद्यावर येतो, समिक्षक त्याचे कौतुक करतात, चित्रपट रसिक तो पाहतात, त्यांना तो आवडतो आणि मला आवडला, तू देखील बघ, छान चित्रपट आहे असे…