आजच्या कार्पोरेट युगात चित्रपटाचे यश किती कोटींची कमाई केली यात मोजले जाते. कधी कधी त्या उत्पन्नाचा आकडा इतका नि असा मोठा असतो की हा चित्रपट खरंच इतका मोठा होता का असा प्रश्न पडतो तर कधी आपण हाच चित्रपट पाह्यला गेलो तेव्हा जे काही मोजके चित्रपट रसिक होते ते तर एकमेकांपासून फार दूर बसले होते आणि…
अभिजात साहित्याची मोहिनी पिढ्यान पिढ्यांवर पडलेली असते. १८९२ साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ‘काबुलीवाला ‘ नावाची एक लघु कथा लिहिली. या कथेवर तपन सिन्हा यांनी १९५७ साली एक अप्रतिम बंगाली भाषेत चित्रपट निर्माण केला. याच कथेचा आधार घेत बिमल रॉय यांनी १९६१ साली एक हिंदी चित्रपट बनवला आणि आता दिग्दर्शक सुमन घोष , मिथुन चक्रवर्ती…
८०च्या दशकामध्ये बॉलीवूडची अवस्था मोठी विचित्र झाली होती. एकतर घरोघरी रंगीत टीव्हीचे आगमन झाल्यामुळे प्रेक्षक सिनेमापासून काहीसा दुरावला होता. त्याचवेळी देशभर व्हिडिओ पार्लर्स पेव फुटल्यामुळे प्रेक्षकांना स्वस्तात आणि ताबडतोब चित्रपट पाहायला मिळू लागल्यामुळे थिएटर येण्याचा त्यांचा कल कमी झाला. अमिताभ बच्चन यांचं आजारपण आणि त्यानंतर राजकारणात त्यांनी केलेला प्रवेश त्यामुळे अमिताभचा बॉक्स ऑफिस करिष्मा काहीसा…
तुम्हालाही कल्पना आहेच, ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित होईपर्यंत जितेंद्रच्या फिटनेस, नृत्य अदा, नवीन पिढीतील अभिनेत्रीचा नायक होण्यातील त्याची व्यावसायिकता याचं भारी कौतुक होत होते. पिक्चरचा फर्स्ट शो पाहून बाहेर पडणारे पब्लिक म्हणाले, यह तो ‘हिम्मतवाली’ की पिक्चर है. श्रीदेवीने आपलं सौंदर्य, बेभान नृत्य अदा, मोकळा ढाकळा स्क्रीन प्रेझेन्स यावर हा चित्रपट आपलासा करुन टाकला...(Bollywood)
इंद्रकुमार दिग्दर्शित ‘राजा’च्या…
चरित्रपट हा कायमच उत्सुकता वाढवतो. संजय दत्तच्या वादळी आयुष्यावरील राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ असो (रणबीर कपूरने ती व्यक्तिरेखा एकदम कडक साकारली) वा भारतीय क्रिकेटमधील चपळ क्षेत्ररक्षक धोनी याच्या जडणघडणीवरील नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ असो हे चरित्रपट यात विशेषच. कारण, संजय दत्त, महेन्द्रसिंग धोनी यांची कारकीर्द आजही आपल्या समोर घडतेय.. (Biopics of Indian…
भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्य पुरस्काराकरीता म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्काराकरीता सर्वाथाने सार्थ असूनही डावललेल्या अभिनेत्री म्हणजे आपल्या मराठमोळ्या कलावंत ललिता पवार. तब्बल सत्तर वर्षे रूपेरी पडद्यावर वावरण्याचा त्यांचा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे. ललिताबाईचं बाईंचे एक वैशिष्ट्य होते त्या श्रीमंत स्त्रीच्या भूमिकेत असताना रुपेरी पडद्यावर तितक्याच ग्रेसफुल श्रीमंत दिसत आणि गरीब स्त्रीच्या भूमिकेत असल्या की तशाच…