आपल्या देशातील चित्रपट-प्रेक्षक संस्कृतीतील एक भारी फंडा म्हणजे, आवडलेला चित्रपट कितीही वेळा न कंटाळता पाहणे…त्या चित्रपटाचे वय कितीही का असेना. त्या वयाशी चित्रपट व्यसनींना काहींही घेणे देणे नसते
‘दिवार’ हा अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट. या सुपर डुपर हिट सिनेमाने अमिताभचे सुपरस्टार पद निश्चित झाले. २५ जानेवारी १९७५ या दिवशी ‘दिवार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यानंतर आठ महिन्यानंतर १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘दिवार’ हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील एक माइल स्टोन सिनेमा ठरला.