धाकड सिनेमाची सुरवातच तशी खराबच झाली. हा भव्यदिव्य बिगबजेट सिनेमा २० मे रोजी प्रदर्शित झाला, पण तो बघायला सिनेमागृहात फारसे प्रेक्षकच नव्हते. एक दिवस तर बुकिंग न झाल्याने सिनेमाचा खेळ रद्द करावा लागला. मराठी सिनेमांसाठी या अशा गोष्ट नवीन नाहीत, पण बॉलिवूडच्या इतिहासात असं क्वचितच कधी झालं असेल