भारतीय सिनेमातील सेंसॉर बोर्ड ही संस्था सुरुवातीपासूनच एक वादग्रस्त ठरली आहे. आज बदलत्या काळानुसार सेन्सॉर बऱ्यापैकी लिबरल झाले आहे पण साठ सत्तर वर्षांपूर्वी मात्र असे चित्र नव्हते. अक्षरशः अगदी हास्यास्पद वाटेल अशा गोष्टींसाठी काही सीन्स आणि गाणी त्या काळात कट केली जात होती. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा या गोष्टी आपण वाचतो किंवा ऐकतो तेव्हा गंमत…