एकामागून एक सेलिब्रिटी कपल प्रेगनन्सी जाहिर करत आहेत. याच यादीत काही दिवसांपूवी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी आई-बाबा होणार असं युनिक पद्धतीने जाहिर केलं होतं. आणि याच कारणामुळे बहुचर्चित ‘ड़ॉन ३’ चित्रपटातून कियाराने(Kiara Advani) मागार घेतली होती. आता तिच्या जागी दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून त्यापैकी एक अभिनेत्री फायनल झाल्याच्या चर्चांना उधाण आलं…
ॲक्शन, इमोशन, ट्रॅजेडी, कॉमेडी या प्रत्येक प्रांतात अमिताभ प्रचंड यशस्वी होत होता. १९७८ साली अमिताभ बच्चन यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्रिशूल, डॉन, गंगा की सौगंध, मुकद्दर का सिकंदर, कस्मे वादे, बेशरम … यातील महत्त्वाचा सिनेमा होता ‘डॉन’.
आजकाल समाज माध्यमांचा प्रभाव एवढा वाढला आहे की, प्रत्येकजण यातील तज्ञ बनला आहे यातूनच काही मजेदार अफवा देखील तयार होतात. त्या इतक्या व्हायरल होवून जातात की, कालांतराने हाच रेफरन्स देवून त्या खऱ्या सिद्ध करता येवू शकतात. सिनेमातील काही गाण्यांबाबत त्याच्या मेकिंग बाबत अनेक कथा या माध्यमातून निर्माण होतात. या सगळ्याच कथा खऱ्या असतात का? तर नाही.
काही सिनेमांच्या मेकिंगची कहाणी अफलातून असते. अनेक अडीअडचणी पार करून तो सिनेमा बनलेला असतो. अशा भरपूर आव्हानांना झेलत जेव्हा असा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकतो आणि सुपर हिट होतो तेव्हा मात्र सिनेमातील प्रत्येक घटक समाधानाच्या भावनेने कृत कृत्य होतो. असाच काहीसा प्रकार अमिताभ बच्चन आणि झीनत अमान यांच्या ‘डॉन’ या चित्रपटाच्या बाबत झाला होता.