साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांनी या वर्षी सिनेसृष्टीतील ५० वर्ष पुर्ण केली...आणि याच निमित्ताने त्यांचा ‘कुली’ (Coolie) हा चित्रपट रिलीज झाला होता... खऱ्या अर्थाने हा एक पॅन इंडिया चित्रपट होता कारण यात मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडा अशा सर्व भाषिक इंडस्ट्रीतील कलाकार यात होते... १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने २० दिवसांमध्ये…
भारतीय चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असून निराळे प्रयोगही मेकर्स करताना दिसत आहेत... सध्या प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी किंवा कोर्टरुम ड्रामा मग ते कुठल्याही भाषेतील असले तरी प्रचंड आवडतायत... यात विशेष नाव घ्यावं ते म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warsi) यांच्या ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3) चित्रपटाचं... एकीकडे या चित्रपटाची…
मखमली स्वरांचा बादशहा तलत मेहमूद याची कारकीर्द उणीपुरी बारा पंधरा वर्षाची. पण या एवढ्या छोट्याशा काळात त्याने अतिशय सुंदर आणि रसिकांच्या काळजात कायम घर करून टाकणारी गाणी गायली. सूरश्री लता मंगेशकर यांनी तलत मेहमूद यांच्याबाबत बोलताना एकदा असं म्हटलं होतं की, “एखादी सुगंधी उदबत्ती अगदी अल्पकाळ जळते आणि विझून जाते पण तिचा सुगंध दीर्घकाळ त्या वास्तूमध्ये…
‘द कश्मिर फाईल्स’, ‘द वॅक्सिन वॉर’ असे जळजळीत विषय आपल्या चित्रपटांमधून मांडणाऱ्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सध्या मराठी जेवणावर केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे… मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) ही अग्निहोत्रींची बायको… नुकत्याच 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चक्क विवेक अग्नीहोत्री मराठी जेवणाला गरीबांचं जेवण समजतात असा खुलासा स्वत: पल्लवी जोशींनी केला…
Janhvi Kapoor : अर्धी दाक्षिणात्य, अर्धी पंजाबी आणि ‘दिल से’ महाराष्ट्रीयन”; जान्हवीची पोस्ट चर्चेत!
९०चं दशक आपलं अभिनय आणि सौंदर्याने गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी... अर्थात श्रीदेवीपेक्षा त्यांच्या मुली कमी टॅलेंन्टेड जरी असल्या तरी आपल्या आईची अभिनयाची Legeacy पुढे नेत आहेत... सध्या श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर तिच्या आगामी परमसुंदरी चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे... साऊथ आणि नॉर्थचं परफेक्ट कॉमेबिनेशन 'चेन्नई एक्सप्रेस'नंतर पुन्हा एकदा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या परमसुंदरी…
सध्या अजय देवगण (Ajay Devgan) आणि मृणाल ठाकूर यांचा 'सन ऑफ सरदार २' चित्रपट चांगलाच चर्चेत आहे… २०१२ मध्ये आलेल्या सन ऑफ सरदार या चित्रपटाचा हा सीक्वेल असून यात अजय देवगणसोबत सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते… आता मात्र, दुसऱ्या भागात या दोन्ही कलाकारांचा पत्ता कट झालेला…
अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असणारा 'सन ऑफ सरदार २' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या चित्रपटातील गाणी आणि विशेषत: अजय देवगण याचा डान्स सध्या तुफान व्हायरल झाला आहे… या चित्रपटातील 'पेहला तु...' या गाण्यात केवळ बोटांनीच डान्स केला आहे अस म्हणत लोकांनी त्याला ट्रोल केलं… आणि आता २०१२ मध्ये आलेल्या…
'स्त्री', 'मुंज्या' या हॉरर कॉमेडी युनिवर्सनंतर (Horror Comedy Universe) आता प्रेक्षकांचा आणि मेकर्सचा कल 'शैतान' (Shaitaan) चित्रपटासारख्या हॉरर-थ्रिलर युनिवर्सकडे वळला आहे… अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर. माधवन यांची प्रमुख भूमिका असणारा 'शैतान' चित्रपट २०२४ मध्ये आला होता… आता याच चित्रपटाचं एक नवं युनिवर्स बॉलिवूडमध्ये तयार केलं जात आहे. यातील दुसरा चित्रपट म्हणजे काजोलची (Kajol)…
अभिनेते के.के. मेनन (Kay Kay Menon) यांची प्रमुख भूमिका असणारी वेब सीरीज Specials Ops 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरीजच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात अधिक उत्कंठा वाढवली होती. स्पेशल रॉ एजंट्सचं आयुष्य, त्यांचे मिशन्स यांनी पुरेपुर भरलेलं कथानक परत एकदा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. दरम्यान, नुकताच या सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून रिलीज डेट…
काही दिवसांपासून बाबू भैय्या अर्थात अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) विशेष चर्चेत आहेत. बॉलिवूडमधील कल्ट चित्रपट हेरा फेरी चित्रपटाचा ते महत्वाचा भाग असून त्यांनी साकारलेली बाबू भैय्या ही भूमिका २५ वर्षांनी देखील तितकीच ताजी तवाणी वाटते. ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता लवकरच ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3) येणार असल्याची घोषणा…