भारतीय चित्रपट संगीतातील किशोर कुमार हे एक अजब रसायन होतं. कुठल्या क्षणी तो कसा वागेल याचा काही अंदाज कोणाला येत नसे. किशोर कुमार बाबत खूप दंतकथा देखील त्या काळात (आणि आजही!) प्रचलित होत्या. ते खूप मनी माइंडेड आहेत, पैशाचा सर्वात आधी विचार करतात. पैसा घेतल्याशिवाय गाणं गात नाहीत. अशा अनेक दंतकथा त्यांच्याबाबत त्या काळात लोकप्रिय…