आज मी लोकल ट्रेनने अंधेरीतील पूर्व बाजूला उतरुन पश्चिम एक्स्प्रेस हायवेकडे निघालो अथवा मेट्रो ट्रेनने गुंदवली स्टेशनवर उतरलो की माझी नजर कार्नरवरील अतिशय उंच इमारतीवरील 'नटराज' हे वाचण्याकडे जातेच जाते आणि मी जुन्या आठवणीत रमतो. ती उत्तुंग इमारत नटराज स्टुडिओ पाडून उभीं राहिलीय. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात या नटराज स्टुडिओचे खूपच मोठें व महत्त्वाचे स्थान आहे.…
आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुंबईत रिक्षा असो, बेस्ट बस असो, लोकल ट्रेन असो, टॅक्सी असो, ओला उबेर असो, मेट्रो असो, मोनो रेल अशा कशातूनही प्रवास करत असताना कायमच व्हाॅटस अप, फेसबुकवर मान/ डोळे लावून असतात, माझी पिढी मात्र अशा प्रवासात बाहेर पाहते. जुन्या पिढीतील चित्रपट रसिक तर अजून शिल्लक असलेली जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स…