दक्षिण मुंबईतील डॉ. भडकमकर मार्गावरील अप्सरा चित्रपटगृह आपल्या अतिशय देखण्या अशा व्यक्तीमत्वाने लक्ष वेधून घेत असे. माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटगृहातील ते होते. मूळ मुंबईकर असलेल्या आणि वयाची तीशीपार चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर अप्सरा चित्रपटगृहाची वास्तू आली असेलच. आत शिरताच समोर असणारे कारंजं आणि बाल्कनीकडे जाणारा रेड कार्पेट जिना. अर्थात मी आणि माझे मित्र अप्सरा असो अथवा…