मी गिरगावातील गल्ली चित्रपट आणि एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीत लहानांपासून चित्रपट एन्जॉय करीत करीत आल्याने माझ्या मनात एका गोष्टीचे कायमच कुतुहल राहिले, ते म्हणजे चित्रपट बनतो कसा? चित्रपट स्टूडिओतील जग कसे आहे? पडद्यावरची माणसं प्रत्यक्षात दिसतात कशी? आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे १९८२ साली मिडियात मी आल्याबरोबर जाणून घ्यायला केलेली सुरुवात आजही…