मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोककलेचा थाट आणि आधुनिक जगण्याच्या नवनव्या छटा मांडणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट अखेर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ताकद दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. गोव्यात झालेल्या ५६व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ‘गोंधळ’ने ‘सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन’मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. गेल्या ५६ वर्षांत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’चा अवॉर्ड मिळाल्याने हा विजय…
“तात्या गोंधळ का म्हणून घालतेय रं?" असं एका चिमुरड्याचा आपल्या आजोबांना प्रश्न असतो. त्यावर आजोबा म्हणजेच तात्या त्याला सांगतात, “खंडेराया जागरण गोंधळाला येतो आणि नवरा-नवरीच्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर घेऊन जातो!" गोंधळ… मराठीत आलेला एक नवीन प्रयोग! पुन्हा एकदा, लोककलेच्या माध्यमातून वेगवेगळी रहस्य उलगडणारा हा चित्रपट बघून तुमच्या डोक्याच्या तारा अक्षरशः हलून जातील. काही छोटे…
भारतीय संगीतसृष्टीत अमुल्य योगदान देणारं एक महत्वाचं नाव म्हणजे पद्मभूषण इलैयाराजा (Ilaiyaraaja)... सिम्फनीच्या ५ टप्प्यांवर राज्य करुन झाल्यानंतर कर्नाटक संगीताची परंपरा पुढे नेत 'पंचमुखी' हा नवा राग इलैयाराजा यांनी निर्माण केला... १५०० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या इलैयाराजा यांनी आगामी 'गोंधळ' (Gondhal Marathi Movie) या मराठी चित्रपटाला संगीत दिलं आहे... अभिमानाची बाब म्हणजे त्यांना मराठी…
आपला पिक्चर जोरदार चालावा आणि प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद द्यावा यासाठी दिग्दर्शक, कलाकार आणि एकूणच कुठल्याही चित्रपटाची टीम जोरदार प्रमोशन करत असते... पण सध्या एका मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चक्क प्रेक्षकांना आमच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहू नका असं म्हटलं आहे... तर, या दिग्दर्शकाचं नाव आहे संतोष डावखर आणि त्यांनी ‘गोंधळ’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर न पाहण्याचं प्रेक्षकांना…